India Languages, asked by skysweetwini3727, 9 months ago

Save Trees Save Life essay in Marathi

Answers

Answered by archana13raut
1

Answer

वाढते प्रदूषण आणि बेसुमार वृक्षतोडीतून घटते वनक्षेत्र ही यामागील कारणे सांगता येतील, याचमुळे ग्लोबल वार्मिगची झळ बसून शेती क्षेत्र धोक्यात आले आहे. पर्यावरण संतुलनासाठी वृक्षलागवडीच्या योजना वर्षोनुवर्षे चालू आहेत.

योजनेचे नाव बदलते पण वनक्षेत्राची स्थिती बदलत नाही. एकूण क्षेत्रफळाच्या तेहतीस टक्के क्षेत्रफळ वनाखाली असावे असा आंतरराष्ट्रीय मानक आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण फक्त १६.४५ टक्के आहे. विशेष म्हणजे २००७ पासून हे क्षेत्र वाढविण्यासाठी सरकारने सुमारे सात हजार कोटी रुपये खर्च केले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. याबद्दल भारताचे नियंत्रक आणि लेखापरीक्षकांनी (कँग) आक्षेप नोंदवला आहे.

२००७ मध्ये राज्यातील एकूण वनक्षेत्र ०५,६५० चौरस किमी होत. २०१५ अखेरीस हेच क्षेत्र ५०,६२८ चौ. किमी म्हणजे २२ चौ. किमी घटले आहे. आंतरराष्ट्रीय मानांकानुसार वृक्षारोपणानंतर तीन वर्षाने किमान ४० टक्के झाडे जगणे अपेक्षित असतात. महाराष्ट्रात मात्र हे प्रमाण २० टक्केपेक्षा कमी असल्याचे आढळून आले आहे. म्हणूनच राज्य वृक्ष शासनाचे १ जुलै रोजी ‘एकच लक्ष, दोन कोटी वृक्ष’असा नारा लागावत वृक्षलागवडीची मोहीम हाती घेतली आहे. ती लोकचळवळ बनल्यास यशस्वी होईल.

Hope this answer helps you .

Similar questions