Hindi, asked by ⲎσⲣⲉⲚⲉⲭⳙⲊ, 7 months ago

sea horse information in marathi.​

Answers

Answered by AkshatShekhar
10

Answer:

समुद्रघोड्याबद्दल आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकले असेल, त्यांच्या बद्दल जाणून घेताना जे कुतुहूल चालवलर जाते ते कायमचेच, कारण त्यांच्याशी निगडीत प्रत्येक नवीन गोष्ट आपल्या मनात अजून प्रश्न निर्माण करते. आज याच जलचराबद्दल जी काही माहिती जगभरात उपलब्ध आहे, त्याबद्दल जाणून घेऊया.

समुद्रघोडा हे नाव ऐकल्यावर लक्षात येत की याचं समुद्राशी काहीतरी नातं असावं आणि हो ते खरंही आहे. जगभरात सीहॉर्स म्हणून प्रसिद्ध असलेला हा एक विचित्र दिसणारा जलचर होय. इंग्रजी ‘एस’ या अक्षराप्रमाणे त्याचा आकार असतो. तो मासा या प्रकारातच मोडतो, पण माशासारखा दिसत नाही. शास्त्रीयदृष्टय़ा हा जलचर हिप्पोकॅम्पस या गटातला आहे. समुद्रघोडय़ाच्या पन्नास प्रजाती आहेत. समुद्रघोडा हा खरं तर बॉनी प्रकारातला मासा आहे. पण माशाप्रमाणे त्यांच्या अंगावर खवले नसतात. त्याऐवजी त्यांच्या संपूर्ण शरीरावर असलेल्या कडय़ांमध्ये व्यवस्थित असलेल्या हाडांच्या पट्टय़ांतून त्यांची पातळ त्वचा ताणलेली असते.

Answered by cutyJanu143
8

Explanation:

आज आपण एका अनोख्या माशाची माहिती घेऊ. हा मासा अजिबातच माशासारखा दिसत नाही; इतर माशांसारखे याच्या अंगावर खवले नसतात, की त्यांच्यासारखी याची शेपटी दुतोंडी नसते. रंग बदलणाऱ्या सरडय़ासारखी, टोकाकडे चकलीसारखी वेटोळी अशी याची शेपटी असते. कांगारूंसारखी पिसांसाठीची एक पिशवी असते आणि घोडय़ासारखी मान असते. ओळखू आलं तुम्हाला आज आपण कुणाविषयी वाचणार आहोत?- समुद्री घोडा.

समुद्री घोडय़ांच्या शरीरावर एकमेकांमध्ये गुंतणाऱ्या हाडांसारख्या कठीण चकत्यांपासून बनलेली तब्बल ४५ वलयं असतात आणि त्यापुढे चिमुकली शेपटी असते. या शेपटीच्या साहाय्यानेच हे समुद्री घोडे समुद्रीशैवालाला धरून राहतात. गंमत म्हणजे, सरडय़ाप्रमाणेच यांचा प्रत्येक डोळा स्वतंत्रपणे हालचाल करू शकतो. लांब नळीसारख्या तोंडामध्ये दात नसतात. मात्र, समुद्री घोडे एम्फिपॉड्स या करंदीसारख्या प्राण्यांवर गुजराण करतात. पोहताना कल्लय़ांनजीक असणाऱ्या चिमुकल्या आणि पारदर्शी परांच्या साहाय्याने समुद्री घोडे आपला तोल सांभाळतात. पाठीवरचा पर, जो प्रामुख्याने पोहण्याकरता कामी येतो, तो सेकंदाला ३५ वेळा फडफडतो- उभ्या उभ्या पोहण्याची यांची पद्धत गंमतशीर आणि अनोखी आहे हे नक्की.

समुद्री घोडय़ांच्या शरीरावर एकमेकांमध्ये गुंतणाऱ्या हाडांसारख्या कठीण चकत्यांपासून बनलेली तब्बल ४५ वलयं असतात आणि त्यापुढे चिमुकली शेपटी असते. या शेपटीच्या साहाय्यानेच हे समुद्री घोडे समुद्रीशैवालाला धरून राहतात. गंमत म्हणजे, सरडय़ाप्रमाणेच यांचा प्रत्येक डोळा स्वतंत्रपणे हालचाल करू शकतो. लांब नळीसारख्या तोंडामध्ये दात नसतात. मात्र, समुद्री घोडे एम्फिपॉड्स या करंदीसारख्या प्राण्यांवर गुजराण करतात. पोहताना कल्लय़ांनजीक असणाऱ्या चिमुकल्या आणि पारदर्शी परांच्या साहाय्याने समुद्री घोडे आपला तोल सांभाळतात. पाठीवरचा पर, जो प्रामुख्याने पोहण्याकरता कामी येतो, तो सेकंदाला ३५ वेळा फडफडतो- उभ्या उभ्या पोहण्याची यांची पद्धत गंमतशीर आणि अनोखी आहे हे नक्की.समुद्री घोडे प्रजननाच्या बाबतीतही सगळ्यांहून निराळे आहेत. छोटय़ा पिलांना आई नव्हे तर वडील जन्म देतात. नर म्हणजेच वडील समुद्री घोडय़ांच्या पोटावर एक पिशवी असते ज्यामध्ये मादी अर्थात आई समुद्री घोडा आपली अंडी घालते. साधारण ३० ते ५० दिवसांनी वडील एक-दोन नाही तर २०० चिमुकल्या पिलांना जन्म देतात. दहा-वीस पिलांच्या एकेका गटामध्ये अशी साधारण दोन दिवसांमध्ये सगळी पिलं जन्माला येतात.

........

Brainliest plzz....

CutyJanu143

Similar questions