Hindi, asked by renukanathani4, 4 months ago

शिक्षक हा खरा मार्गदर्शन​

Answers

Answered by anjali5087
10

Answer:

भारताचे माजी राष्ट्रपती, थोर तत्वज्ञ आणि शिक्षकांचे आदर्श डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती उद्या ५ सप्टेंबरला ‘शिक्षक दिन’ म्हणून देशात सर्वत्र साजरी केली जाते. खरा आदर्श शिक्षक कसा असावा, त्याने आपली कर्तव्ये कशी पार पाडावीत याचे मार्गदर्शन त्यांनी केले आहे. शिक्षक हा समाजात सदैव पूजनीय असतो. शिक्षक ही समाजाची आधारशीला असून तोच राष्ट्राचे भविष्य निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम करतो. शिक्षकाला ईश्‍वराचा दर्जा दिला आहे. त्यांना अध्ययन, अध्यापन करणार्‍या ऋषीमुनींचे वारसदार म्हटले आहे. राष्ट्रसंपन्न, सामर्थ्यशाली, स्वावलंबी आणि प्रगत होते ते त्या राष्ट्राच्या शिक्षणाच्या दर्जावरून आणि हे कार्य करण्याचे शिवधनुष्य केवळ शिक्षकच पेलू शकतो.

शिक्षकांना आपल्या व्यवसायात अनेक भूमिका बजावाव्या लागतात. पालक, सल्लागार, आदर्श व्यक्ती, मित्र आणि शिस्त लावणारा अशा अनेक भूमिका ते बजावतात. आजही अनेक शिक्षक आपल्या आदर्श पदपथावरून चालत एक आदर्श समाज निर्माण करण्याची परंपरा चालवत आहेत. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील नाते जितके सदृढ असेल तेवढे सक्षम नागरिक भविष्यात उभे राहणार आहेत. शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते गुरु-शिष्यासारखेच असायला हवे. शिक्षकांचा आदर केलाच पाहिजे, ही शिकवण विद्यार्थ्यांना देताना शिक्षकांनीही आपले कार्य निष्ठेने करायला हवे..

Mark me as brainlist

Similar questions