शिक्षक। हा शब्दाचे वचन बदला
Answers
शिक्षक
शिक्षक या शब्दाचे एकवचन देखील शिक्षकच आहे आणि या शब्दाचे अनेकवचन देखील शिक्षकच राहील.
भाषेमध्ये असे अनेक शब्द आहेत ज्यांचे वचन बदलत नाही म्हणजेच एकवचन व अनेकवचन दोन्ही एकच राहते.
उदाहरणार्थ- शिक्षक, रंग, ढग, इत्यादी.
दिलेल्या प्रश्नानुसार आपल्याला दिलेल्या शब्दांचे वचन बदलवायचे आहे.
वचन म्हणजे काय?
एखादा शब्द बोलल्यानंतर ती वस्तू एक आहे किंवा अनेक याचा बोध ज्या गोष्टीच्या माध्यमातून होतो त्याला वचन असे म्हणतात.
वचनाचे दोन प्रकार पडतात.
एकवचन आणि अनेकवचन
अनेकवचन -
एखादा शब्द उच्चारल्या नंतर एकापेक्षा जास्त गोष्टींचा उल्लेख होत असेल त्यावेळेस तो शब्द अनेकवचनी शब्द असतो.
उदाहरणार्थ -पुस्तके, गावे, बादल्या, गाड्या, वह्या
एकवचन -
ज्यावेळेस एखादा शब्द बोलल्यानंतर एकच गोष्टीचा उल्लेख होतो त्यावेळेस ही गोष्ट एक वचनी आहे असे म्हणतात.
उदाहरणार्थ - झाड, पतंग, पुस्तक, गाव बादली, गाडी, वही
वचनाबद्दल अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा-
https://brainly.in/question/26857939
https://brainly.in/question/23229554
#SPJ3