शिखांना लष्करी स्वरूप कोणत्या धर्मगुरूंनी
दिले?
Answers
Answer:
श्री गुरु गोवंदसिंग
pls mark me brainlist
Answer:
गुरु गोविंदसिंग
Explanation:
वयाच्या नवव्या वर्षी गुरु गोविंदसिंग हे गादीवर बसले. त्यांनी शीख समाजाला सुसंघटित केले. राजकीय जागृती गुरु गोविंदसिंग यांनी शिखांमध्ये निर्माण केली. त्यांनी 'खंडेदाअमृत' नाव असलेला एक शीख दीक्षाविधी सुरू केला. या विधीनंतर सर्व शीख अनुयायांना त्यांच्या नावापुढे सिंग लावण्याचा अधिकार मिळाला.
त्यांच्या अनुयायांना 'खालसा' असे देखील म्हटले जाते. गुरु गोविंदसिंग हे खालसा पंथाचे संस्थापक होते. त्यांनी एकेश्वर मताला महत्व दिले. राष्ट्रभक्ती व शौर्य या गोष्टींना त्यांनी शिकवणुकीत प्रथम स्थान दिले.
गुरु गोविंदसिंग या धर्मगुरूंनी शिखांना लष्करी स्वरूप दिले.
लष्कराचे शिक्षण देऊन एक शिस्तबद्ध फौज तयार केली. 'ग्रंथसाहिब' या ग्रंथाला गुरुंचे स्थान द्यावे असा संदेश त्यांनी त्यांच्या अनुयायांना दिला.