शालेय वाचनालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र पुस्तक विक्रेत्यास लिहा
Answers
मुलांना शाळेत विविध विषयांवर मराठी पत्रलेखन करावयास सांगितले जाते आणि ग्रंथालयात पुस्तकांची मागणी करणारे पत्र हे त्यापैकीच एक. ह्या पत्रामध्ये विद्यालयाचे ग्रंथपाल आयडियल बुक डेपो च्या व्यवस्थापकांना पत्र लिहून काही पुस्तकांची मागणी करत आहे. पत्रामध्ये पुस्तकांची यादी हि दिली आहे. हे पत्र औपचारिक पत्र असल्यानी ह्यातील भाषेचा उपयोग हि औपचारिक आहे. हे पत्र तुम्हाला तुमच्या गृहपाठ तसेच पत्रलेखनामध्ये नक्कीच मदत करेल. चला तर मग सुरु करूया.
तुमच्या शाळेच्या ग्रंथालयास आवश्यक असलेल्या पुस्तकांची मागणी करणारे पत्र माननीय व्यवस्थापक आयडियल बुक डेपो, दादर, मुंबई – ४०००२८ याना ग्रंथालय प्रमुख पत्र लिहीत आहेत.
ग्रंथालयास आवश्यक असलेल्या पुस्तकांची मागणी करणारे पत्र
ग्रंथपाल
सरस्वती विद्या मंदिर,
टिळक नगर, डोंबिवली(पूर्व)
दिनांक ६ सप्टेंबर , २०२०
प्रति,
माननीय व्यवस्थापक
आयडियल बुक डेपो
दादर, मुंबई – ४०००२८
विषय – पुस्तकांच्या मागणीबद्दल पत्र.
माननीय महोदय,
आमच्या शाळेच्या ग्रंथालयासाठी आपल्याकडून काही पुस्तके मागविण्यासाठी हे पत्र पाठवीत आहे. सोबतच ७०० रुपयांची मनी ऑर्डर पाठवत आहे. उरलेली रक्कम नांतर पाठवू. पुस्तकांच्या किमतीवर योग्य ती सवलत देण्याची कृपा करावी.
पुस्तकांची यादी
पुस्तकाचे नाव लेखक प्रति
१. श्यामची आई साने गुरुजी १०
२. स्मृतिचित्रे लक्ष्मीबाई टिळक २०
३. कलिका वि.स. खांडेकर १५
४. व्यक्ती आणि वल्ली पु.ल. देशपांडे १०
५. विशाखा कुसुमाग्रज १५
६. बटाट्याची चाळ पु.ल. देशपांडे २०
आपणास नम्र विनंती आहे की लवकरात लवकर पुस्तके पाठविण्याची कृपा करावी तसदीबद्दल क्षमस्व. मराठी पत्रलेखन कसे करावे? प्रकार, मायना, नमुना, उदाहरणे, विषय
आपला कृपाभिलाषी,
ग्रंथपाल प्रमुख
(सरस्वती विद्या मंदिर)
मी आशा करतो कि तुम्हाला हे पत्र आवडले असेल. जर ह्या लेखामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत झाली असेल तर कृपया खाली कंमेंट सेकशन मध्ये तूच
दूरध्वनी सेवा विस्कळीत झाल्याबाबत अधिकाऱ्यांना तक्रार पत्र
पोलिसांची फेरी वाढविण्यासाठी पोलीस आयुक्तांना विनंती पत्र
वाढत्या जलप्रदूषण नियंत्रणाबाबत प्रदूषण विभागाला तक्रार पत्र
गावापर्यंत बस, एस.टी. सेवा सुरु करण्यासाठी विनंती पत्र, अर्ज
वर्गातील छताची दुरुस्तीबाबत मुख्याध्यापकांना पत्र, अर्ज
ग्रंथालय, लायब्ररीमधून पुस्तके घेण्याबाबत प्राचार्यांना पत्र
Answer:
Explanation:
मुलांना शाळेत विविध विषयांवर मराठी पत्रलेखन करावयास सांगितले जाते आणि ग्रंथालयात पुस्तकांची मागणी करणारे पत्र हे त्यापैकीच एक. ह्या पत्रामध्ये विद्यालयाचे ग्रंथपाल आयडियल बुक डेपो च्या व्यवस्थापकांना पत्र लिहून काही पुस्तकांची मागणी करत आहे. पत्रामध्ये पुस्तकांची यादी हि दिली आहे. हे पत्र औपचारिक पत्र असल्यानी ह्यातील भाषेचा उपयोग हि औपचारिक आहे. हे पत्र तुम्हाला तुमच्या गृहपाठ तसेच पत्रलेखनामध्ये नक्कीच मदत करेल. चला तर मग सुरु करूया