CBSE BOARD X, asked by JaykymarBhairi, 6 months ago

शाळेच्या उदयानात लावण्यासाठी औषधी
वनस्पतीची मागणी करणारे पर पत्र लिहा.​

Answers

Answered by 41dinesh95kumar
0

Answer:

वनस्पति, औषधी : रोगनिवारण, वेदनाशमन इ. वैद्यकीय उद्देशांकरिता वापरण्यात येणाऱ्या वनस्पती. या वनस्पतींच्या निरनिराळ्या भागांपासून ( उदा., पाने, मुळे, खोड इ. ) तयार केलेले काढे, अर्क, लेप, अलग केलेली क्रियाशील रासायनिक द्रव्ये इ. स्वरूपांत या वनस्पतींचा उपयोग केला जातो.

इतिहास : फार प्राचीन काळापासून प्राणिसृष्टी तिच्या दररोजच्या गरजा भागविण्यासाठी वनस्पतींवर अवलंबून रहात आहे. एकूण जीवसृष्टीमध्ये वनस्पतीच स्वयंपूर्ण आहेत. आदिमानवाच्या काळापासून मानव जंगलातील शिकारीबरोबर वनस्पतीकडे लक्ष पुरवू लागला. निसर्गचक्राप्रमाणे निरनिराळ्या वनस्पतींचे रूजणे, वाढणे, फुले व फळे येणे आणि परत बियांपासून त्यांचे पुनरूत्पादन होणे, हे त्याने नीट पाहिले. निरनिराळ्या वनस्पतींची चव, रूची, ठराविक वनस्पती खाल्ल्याने होणारा परिणाम हेही त्याने अनुभवले. त्या अनुभवाच्या व निरीक्षणाच्या साह्याने त्याने वनस्पतींचे वर्गीकरण केले. अमुक एक वनस्पती खाद्योपयोगी आहे, तिची रूची गोड आहे, ती कोणत्या ऋतुमानात येते, तीपासून खाद्योपयोगी पदार्थ कसा बनविता येईल इ. आडाखे त्याने बांधले. काही ठराविक वनस्पती सारक आहेत, काही शरीराच्या वाढीस उपयुक्त, तर काही निरूपयोगी आहेत. ह्या वनस्पतिसृष्टीच्या अनुभवाबरोबरच आयुष्यक्रमात निरनिराळ्या निसर्ग आविष्करांचाही त्याने अनुभव घेतला. त्यामुळे झालेल्या काही परिणामांनी जेव्हा तो त्रस्त झाला, तेव्हा त्याने पंचमहाभूतांची पूजा केली, प्राण्यांचा बळी दिला, वनस्पतींच्या समिधांचा होम केला. वनस्पतींवर विश्वास ठेवून संकट निवारण व्हावे म्हणून त्या भक्षण केल्या. बऱ्यावाईट अनुभवांनंतर वनस्पतींच्या निरनिराळ्या उपयोगांचे त्याला ज्ञान झाले. जादुटोण्याकरिता वापरावयाच्या जालीम वनस्पतींबरोबरच अंगाचा दाह कमी करण्यासाठी उटणी म्हणून वापरावयाच्या वनस्पती त्याने शोधून काढल्या. वेगवेगळे अनुभव व निरीक्षणे ह्यांवर आधारित अनुभवी माणसांची परंपरा तयार होऊ लागली. वनस्पतींमध्ये ताकद देण्याची, वाढविण्याची क्षमता आहे, तसेच रोग दूर करून आराम देणाऱ्या दिव्य औषधी वनस्पती आहेत, ह्याचे त्याला ज्ञान झाले.

Explanation:

your ques. is not clear but i give ans. so i hope it's help you....

Similar questions