शाळा सुरु होण्याच्या पाश्र्वभूमीवर शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यासाठी शाळेत यावे, अशी विनंती करणारे पत्र धांडे पेथोलोजि लॅब च्या व्यवस्थापकांना लिहा.
Answers
राज्यातील सरकारी, अनुदानित तसेच खासगी व्यवस्थापनाच्या नववी ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा आणि त्यांचे वर्ग २३ नोव्हेंबरला सुरू होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर, शिक्षकांना कोविड चाचणी करावी लागणार होती. ही चाचणी सरकारमार्फत होणार असल्याचे सरकारने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
राज्यात २४ जूनपासून आतापर्यंत पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतचे सर्व शिक्षण ऑनलाइन सुरू होते. परंतु, राज्यात काही दिवसांत करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने शालेय शिक्षण विभागाकडून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, 'मिशन बिगिन अगेन' अंतर्गत राज्यातील सर्व शाळा येत्या काळात टप्प्याटप्प्याने सुरू करण्यासाठी सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर, राज्यातील शाळा सुरळीतपणे सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने मागील चार दिवसांपूर्वी शासन निर्णय जारी केला असून, नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग आणि शाळा सुरू केल्या जाणार आहेत.