शाळेतील रंगमंचावर सादर केलेल्या कार्यक्रमाचा तुमचा अनुभव लिहा
Answers
Answer:
शाळेतील रंगमंचावर सादर केलेल्या कार्यक्रमाचा अनुभव या विषयवारील माझे पाहिले भाषण हा निबंध सविस्तर वाचण्यासाठी आमच्या website ला visit करा.
www.sopenibandh.com
माझा अनुभव शाळेतील रंगमंचावर सादर केलेल्या कार्यक्रमाचा
मी ईयत्ता चौथी मध्ये शिकत असतानाची गोष्ट आहे. मला चांगलाच आवडतो तो दिवस. मराठीचा तास चालू होता. थोड्या वेळाने मधली सुट्टी होणार होती. तेवढ्यात शिपाई काका सूचना वहीमध्ये काही तरी सूचना घेऊन आले आणि त्यांनी ती वही मराठीच्या बाईंकडे वाचायला दिली. बाईंनी सूचना वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिले होते की शिक्षकदिनानिम्मित वर्गातील काही विद्यार्थांनी आपल्या शिक्षकांसाठी भाषण करायचे आहे.
अखेर भाषणाचा दिवस उजाडला. माझे भाषण चांगले पाठ झाले होते. मी शाळेत गेलो आणि एक एक करून मुले भाषणासाठी मंचावर येऊ लागली. या नंतर आता माझी भाषणाची वेळ होती. आणि माझे नाव घेण्यात आले. आता मात्र माझे हातपाय खूप थंड पडले होते. मी हळू हळू मंचाच्या दिशेने जाऊ लागलो.
माझ्या मनामध्ये खूप जोरजोरात धडधड चालू झाली होती. पाठ केलेल्या भाषणाच्या ओळी मी सारखा मनातल्या मनात आठवत होतो. काही सुचत नव्हते. माझ्या वर्ग शिक्षिकाना माझ्या चेहऱ्यावरील भीती दिसण्यात आली. त्या पुढे आल्या आणि त्यांनी माझ्या पाठीवर मायेने हात फिरवला आणि मला मंच्याकडे जाण्यास सांगितले.
आता मी माझे भाषण सूरू केले आणि जसे जसे आईने माझ्याकडून पाठांतर करून घेतले होते तसतसे मी ते बोलू लागलो. आता मी जसजसे भाषण पुढे पुढे बोलत होतो तसतसे माझ्यामध्ये आत्मविश्वास वाढत जात होता. माझे भाषण संपता संपता मला माझ्या शिक्षकांचा आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणीच्या टाळ्यांचा कडकडाट ऐकू आला. माझे भाषण खूपच छान झाले होते.माझ्या आईचा चेहरा सारखा माझ्या डोळ्यासमोर येत होता. तिने माझ्यामध्ये जो आत्मविश्वास जगावला होता त्यामुळे आज मी हे करू शकलो होतो. सगळे माझे खूप कौतुक करीत होते. बाईंनी पण माझे खूप कौतुक केले. स्वतः मध्ये असलेल्या या सुप्तगुणांची आज मला खरी ओळख झाली होती.
कधी एकदा घरी जाऊन आईला सगळे सांगतो असे आता मला झाले होते. त्या वेळी बाईंनी माझ्या पाठीवर दिलेली शाबासकीची थाप मी आजपर्यंत विसरलो नाही. त्या दिवशी मला खूप अत्यानंद झाला होता. असे हे माझे पहिले भाषण मी कधीच विसरणार नाही.