Hindi, asked by Sharnagat, 9 months ago

शेना मातीचे घर या कवितेचे रसग्रहण मराठी ​

Answers

Answered by ajaykryadav2614
0

Answer:

ना. धो. महानोरांच्या या कवितेचे रसग्रहण मी पुढे देत आहे.

या नभाने......!

नारायण धोंडो महानोर या मराठवाड्यातील निसर्गावर प्रेमकरणार्‍या कवींची ही कविता

महानोरांचे रानातल्या कविता, वही, पावसाळी कविता, प्रार्थना दयाघना

पळसखेडची गाणी हे काव्यसंग्रह लोकप्रीय झाले आहेत.

महानोरांची कविता जीवंत, सळसळणारी, व चैतन्यानी भारलेली आहे. ही कविता आहे निसर्गाची, शेताभाताची, आकाश धरतीची कविता आहे.

कवितेला ऊपजत अशी लय आहे.त्यामुळे कोणी वेगळी चाल न लावताही ती वाचकाला गुणगूणता येते.

ही कविता निसर्गातील परस्पर तादात्म्याची आहे तशीच तिला एक सामाजिक परिमाण आहे.

कविता केवळ ३ कडव्यांची आहे . पण खूपच आशयघन आहे . भारतीयअर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी आणि त्याच्या खळ्यात येणार पीक हे कवीला मोलाच वाटतं आणि म्हणून पहिल्या कडव्यात कवी निसर्गाला आणि जगदनियंत्याला विनवतात की ,'ह नभानो हे जलदांनो तुम्ही महान दाते आहात. या धरित्रीला या मातीला जलबिंदूंच असं दान द्या की अवघी माती कोंबांकोंबातून गीत गाईल,चैतन्याने डुलू लागेल. कविला मनोमन प्रश्न पडतो की असं कोणाचं कोणतं पुण्य फळाला येतं की जोंधळ्याची कणस चांदण्यासारख्या तुकतूकीत दाण्यांनी खळ्यात लुकलूकु लागतात? त्याचा त्यांना आनंदमिश्रीत विस्मयही वाटतो.

दुसर्‍या कडव्यात ते कृतज्ञतेच्या भावनेनी

भारावून म्हणतात , 'या नभाच्या दानामुळे आणि नंतर येणार्‍या सुफळ अशा पीकपाण्यामुळे माझ्या डोळ्याच्या पापण्या आनंदाश्रृंनी ओथंबतात. ऋतुचक्र पालू राहत. नववर्षा ते पेरणी ते कापणी या पीकं तयार होण्याच्या ९ महान्यांच्या ऋतुचक्रात अवघ्या निसर्गावर, सृष्टीवर सृजनाची नवकांती पसरली आहे.दाणे भरलेल्या कणसांवर फिरून फिरून पाखर झेपावतायत आणि त्यांच्या त्या खेळात मी जणू त्यांच्याबरोबरोबर खेळगडी होऊन डाव मांडतोय. किती सजीव असं चित्रण आसे र्निसर्गाचं ! आणि कवीचं मनही कसं निर्व्याज आहे!

कवी महानोर हे हाडाचे शेतकरी आहेत. ते कायम खेड्यात शेतातल्या घरावर राहतात . झाडं पानं फुलं नद्या शेतं प्राणी यावर त्यांच नितांत प्रेम आहे. बळिराजा ,त्याचं स्वप्न, त्याच्या इच्छा आकांक्षा याची खोलवर जाण त्यांना आहे.

म्हणूनच ते लिहतात,

'गुंतलेले प्राण ह्या रानात माझे

फाटकी ही झोपडी काळीज माझे,

झरता पाऊस ,वाहते ओहोळ, नवांकुर आणि डोलतं पिक , सुर्याची सोनकिरणं हे सारं पाहून ते आनंदानी बेहोश होतात आणि न कळत त्यच्या भावना कवितेतून आकाराला येतात . कवितेला साद घालताना ते शेवटच्या ओळीत लिहतात ,"शब्दगंधे ' तू मला बाहूत घ्यावे!"

कवितेत यमक साधताना कवीला शब्दांशी झगडावं लागलं नाहीये. ऊलट रेशमी लड अलगद ऊलगडत जावी तशी शब्दांची फुलपाखरं कवितेतल्या ओळींच्या फांदी फांदीवर लिलया बसतात.त्यांच्या कवातेतील शब्दाशब्दाला नभाचा, मातीचा , वार्‍याचा थेंबाचा, दरवळणार्‍या कणसांचा , गंध आहे.ऋतुंचा रंग आणि गंध आहे!

म्हणुनच त्यांची ही आणि अशा अनेक शब्दगंधी ऋतूरंगी कविता मला फार भावतात.ओठावर रूणझुणतात,

अंजना कर्णिक

स्पर्धेसाठी रसग्रहण,

◆◆◆◆◆◆◆◆

पक्षी जाय दिगंतरा,बालकासी आणि चारा

घार हिंडते आकाशी,झांप घाली पिल्लांपासी

माता गुंतली कामासी,चित्त तिचे बाळापाशी

वानर हिंडे झाडावरी,पिलीं बांधुनी उदरी

तैसी आम्हांसी विठ्ठल माये,जनी वेळोवेळां पाहे

..........संत जनाबाई

ही जनाईची रचना विशेष आवडण्याचे पहिले कारण म्हणजे मी स्वतः एक स्त्री व आई आहे.

"नामयाच्या जनाईने

केले सडासंमार्जन,

हात अबीर-मंजिरी

गंधे भारिले गगन"

असे ज्या विदुषीचे वर्णन केले जाते,अशी ही जनाई.खरतरं तिचं वर्णन करायला आकाशाचा कागद व समुद्राची शाई केली तरी कमीच पडेल.जिचे जाते ओढायला प्रत्यक्ष पांडूरंग सरसावतोे ती ऋषीतुल्य कवयत्री.

....मी देखील या संदर्भात एक चारोळी रचलीय....

"ओवीसंगे दंग

असा अभंग,

जणू आभाळात

इंद्रधनूष्य"

आज महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात जनाईचे नाव श्रद्धेन घेतलं जातं.जेवढं महत्व नामदेव पायरीला,तेवढचं महत्व जनाईच्या जात्याला व सेवाभावनेला दिलं जातं.

अभंगात त्या विठ्ठलाशी समरूपतेसंबंधी विविध दाखले मांडतांना दिसतात.

घार जशी पिलासाठी अन्न शोधत आभाळभर फिरते तरी तिचं सगळं लक्ष घरट्याकडे असते.आई कामात कितीही दंग असली तरी काम करता करता ती डोळ्यात तेल घालून बाळाकडे लक्ष ठेवून असते.यासंदर्भात हिरकणीची कथाही इथे चपखल बसते.वानरी देखील झाडांवर उड्या मारतांना पोटाच्या बाळाला जिवापाड जपते.तसचं माऊली आम्हाला सांभाळते हे त्यांना सांगायचं आहे.

मी एक नोकरपेशा आई असल्यामुळे हा अनुभव मी रोजच घेत असते.नोकरीच्या जागी असतांना जसा वेळ मिळेल तसं फोनवरून मुलांची काळजीवजा चौकशी करून सुखावत असते.

........महाराष्ट्राच्या संतपरंपरेस समर्पित

.......जयश्री पाटील@75

वसमतनगर

........स्पर्धेसाठी☝

◆◆◆◆◆◆◆◆

साहित्य मंथन – विषय – कविता रसग्रहण-

कवितेचे शिर्षक आहे आई—१ – कवि – ग्रेस

ही कविता चंद्रमाधवीचे प्रदेश या काव्य संग्रहातून

घेतलेली आहे.प्रकाशन पॉप्युलर प्रकाशन – मुंबई

आई—१

Similar questions