शिरीष चा स्वभाव वैशिष्ट्ये सांगा
Answers
Answer:
शिरीष व्यंकटेश पै (जन्म : १५ नोव्हेंबर, १९२९; मृत्यू : मुंबई, २ सप्टेंबर, २०१७[१]) या एक मराठी कवी, लेखिका आणि नाटककार होत्या. आचार्य अत्रे हे त्यांचे वडील. पती व्यंकटेश पै हे वकील होते.
शिरीष पै यांनी कथा, कविता, नाटक, ललित लेखन अशा सर्व प्रकारच्या साहित्यात उल्लेखनीय योगदान दिले. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी आचार्य अत्रे यांच्या 'मराठा'मध्ये पत्रकार म्हणून काम केले होते. त्या बी.ए.एल्.एल.बी होत्या. त्या १९५६ ते १९६० या काळात नवयुग साप्ताहिकाच्या, १९६१ ते १९६९ या काळात दैनिक मराठाच्या वाङ्मयीन पुरवणीच्या, आणि १९६९ ते १९७६ या काळात दैनिक 'मराठा'च्या संपादक होत्या. वृत्तपत्रांतून त्यांचे अग्रलेख. पुस्तक परीक्षणे, मुलाखती आणि वाड्मयीन लेख प्रसिद्ध होत असत. त्यांनी आयुष्याची २५ वर्षे वृत्तपत्र व्यवसायात घालवली. त्यामुळे स्फुटलेखनाची त्यांना सवय होती. त्यांनी राजकीय लेखनही केले.