English, asked by jagdish101660, 5 months ago

शीर्षक वरून कथा लेखन लिहा
खरी मैत्री
IN MARATHI
CORRECT ANSWER SHOULD ME MARK AS BRAINLIEST

Answers

Answered by simra4825
29

Answer:

HEY MATE HERE'S YOUR ANSWER

Explanation:

मला एकदा माझ्या मुलाने एक प्रश्न विचारला . आई तुला किती मित्र मैत्रिणी आहेत ?मी म्हणाले असंख्य . तो म्हणाला , खरंच ? हो बाबा आहेत . त्याचे वय लहान असल्याने त्याला या गोष्टीचे नवल वाटले . मग मी त्याला विचारले तुला किती मित्र मैत्रिणी आहेत ?तो म्हणाला थोडेच . मग त्याला मी सांगितले की मैत्रीचं नातं हे खूप सुंदर असं नातं आहे . त्याला वयाची , धर्माची , जातीची, श्रीमंतीची, रंगरूपाची कुठलीच बंधनं नसतात . आपण अशा प्रकारे जास्तीत जास्त लोकांशी मैत्री केली तर आपल्याला आयुष्यात काही ती कमी पडत नाही . मी मैत्री करताना प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव कसा आहे ते बघते . बाकीच्या गोष्टी माझ्या दृष्टीने गौण आहेत . मैत्री ही एकमेकांच्या विश्वासावर आधारलेली असते. जेव्हा आपण हक्काने काही गोष्टी एकमेकांशी शेअर करतो तेंव्हा त्या बाबी फक्त आणि फक्त आपल्या पुरत्याच मर्यादित असतात . त्याचा इतर लोकांशी काहीही संबंध नसतो . म्हणून मैत्रीचा पायाच मुळी विश्वासावर अवलंबून असतो. शंका , अविश्वास यावर आधारीत असलेली मैत्री कधीच तग धरू शकत नाही . मैत्रीचं नातंच असं आहे त्यात हक्काने भांडण , रुसवा , वाद , अबोला या गोष्टी ओघानंच येतात . पण त्या गोष्टी जास्त ताणायच्या नाहीत . आपल्याला अंतर्यामी सुख मिळणारं एकमेव ठिकाण म्हणजे मैत्री . नुसतंच गोड गोड बोलणारी माणसे कधी धोकादेतील सांगता येत नाही . खरी मैत्री तीच जी एकमेकांच्या चुका सुदधा बिनधास्तपणे सांगतील आणि त्या चुका मान्य करून स्वत : त बदल घडवतील . प्रत्येकच मनुष्य काही परिपूर्ण नसतो परंतु त्याला योग्य ठिकाणी , योग्य प्रकारे पैलू पाडणारा , त्याला घडवणारा एक मित्रच असतो .

माझ्या बऱ्याच मैत्रिणी अशा आहेत जिथे चेष्टामस्करी चालते पण निंदानालस्ती नाही . हळूवारपणे एखादीची चूक दाखवून दिली जाते. ती सूधरून घेवून पुढे वाटचाल करावी . जेणेकरून जगात वावरत असताना ती सक्षम व्हावी, समर्थ व्हावी. कोणतेही संकट आले तरी तिने त्याला व्यवस्थित तोंड दिले पाहिजे . कच खाऊ नये असे आम्हाला एकमेकींबदादल नेहमी वाटते.

मैत्री म्हणजे आनंद , सुख मिळण्याचे एकमेव ठिकाण . म्हणूनच माणसाने आयुष्यात संपत्ती भले कमी कमवावी पण मित्र मैत्रिणी भरपूर कमवाव्यात तरच आपले आयुष्य अधिकाधिक समृद्ध बनते .

HOPE IT WILL HELP YOU PLZ MRK AS BRAINLIST ☺️

DON'T FORGET TO FØLLØW ME TO

HV A GOOD DAY

Answered by Parthchaudhari643
2

Answer:

मैत्री म्हणजे मैत्री... मैत्री म्हणजे विश्वास... मैत्री हवी जीवा शिवाची... कृष्ण सुदाम्याची... रक्ताच्या नात्यापलीकडले नाते म्हणजे मैत्री. मैत्रीचा प्राण आहे विश्वास... गैरसमज नी अविश्वास हे मैत्रीचे खरे शत्रू... मैत्रीत व्यवारिक्ता अजिबात नको... उपकार,स्वार्थ, नफा, तोटा, हिशोब तर अजीबात च नको मैत्री ही नि:स्वार्थच असते नी नि:स्वार्थच हवी... मैत्री म्हणजे आत्म्यांचं नातं... मैत्री ही उघड्या डोळ्यांनी नाही तर डोळे झाकून असावी... मैत्री हा धर्म हवा.. मैत्रीत ना उपकार,ना आभार,ना धन्यवाद... खरीखुरी आत्मीयताच मैत्रीत हवी. गरज सरो नी वैद्य मरो ही मैत्री नव्हे.शहाण्याने जीवाला जीव देणारे मित्र जोडावे असे म्हणतात...असा मित्र ज्याला लाभला तो भाग्यवानच... मैत्री जीवन घडवू, बिघडवू शकते...??नव्हे घडवूच शकते.. मैत्री एक नाजूक बंधन आहे... त्याला खूप खूपच जपावं लागतं...जी जपली जाते ती मैत्री...जी टिकली,टिकवली जाते ती मैत्री...जी अबाधित राहते ती मैत्री..जी तुटतच नाही ती मैत्री...खरी मैत्री बंधुत्व जोपासते. भावाभावात नसेल तेवढं प्रेम, विश्वास मैत्रीत असतो...बस्स अजून काय असावं? मैत्री ही मैत्रीच असते.मैत्री टिकवावी नाही टिकावी लागते. मैत्री लाभावी लागत

Similar questions