English, asked by kalaskartruptikalask, 11 months ago

श्रमाचे महत्त्व वैचारिक लेखन श्रमाचे श्रमजीवींचा आदर​

Answers

Answered by tanmayeeratha1822
1

Answer:

I don't know please ask to your elder

Answered by ajjubhai9429
2

Answer:

आजचे युग हे विज्ञान संगणक युग मानले जाते. या संगणक युगात आपण सर्वजण वावरत आहोत. आज संगणक युगामुळे मानवाचे जीवन अगदी सुलभ झाले आहे. त्यामुळे मानव सगळी कामे यंत्राच्या साहाय्याने करू लागला आहे.

त्यामुळे काम करून घाम गाळणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यामुळे शारीरिक श्रम करणाऱ्या श्रमिकांना आज यंत्र युगाच्या काळात निकृष्ट मानले जात आहे. असे करणे म्हणजे एक प्रकारे श्रमाचा आणि श्रमिकांचा अपमान आहे.

बौद्धिक कष्टा इतकेच शारीरिक कष्ट करणे सुद्धा महत्वाचे आहे. कष्ट केल्यानेच माणसाची प्रगती होते. तसेच जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी सुद्धा श्रम करणे महत्वाचे आहे.

श्रम म्हणजे काय –

श्रम म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती आपले ध्येय व स्वप्न पूर्ण करण्यासाठी शारीरिक किंवा बौद्धिक कष्ट करते व मेहनत करते त्याला एका अर्थाने काम करणे असे म्हटले जाते. श्रम करण्यामागे ध्येय मिळवण्याचा विचार असतो.

श्रमाचे प्रकार

कोणतीही व्यक्ती जे श्रम करते त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसे कि

शारीरिक श्रम

शारीरिक श्रम करणारा माणूस हा बांधकाम करणे म्हणजेच विटा उचलणे, सिमेंट लावणे किंवा मिसळणे इ काम करतो त्याला ‘शारीरिक श्रम’ असे म्हटले जाते.

बौद्धिक श्रम

शिक्षक जेव्हा शिकवण्याच आणि विद्यार्थी जेव्हा शिकण्याच काम करतात त्याला ‘बौद्धिक श्रम’ असे म्हटले जाते. हे दोघेही आपल्या बुद्धीला कष्ट देत असतात. कोणत्याही गोष्टीचा कसला तरी चिचार करणे याला सुद्धा आपण शरम म्हणू शकतो. कारण त्यामध्ये माणूस आपल्या बौद्धिक क्षमत वापरतो.

रोजगारी

काही व्यक्ती हे रोजगारीची सुद्धा कामे करतात. जेव्हा श्रम करण्यासाठी आर्थिक मोबदला दिला जातो त्या श्रमाला रोजगारी असे म्हटले जाते.

Explanation:

pls mark as brainliest answer

Similar questions