श्रमाच्या मोबदल्यात हे मिळते.
Answers
Answer:
संपत्तीच्या उपयोगातून निर्माण होणारा वा मानवी श्रमांच्या मोबदल्यात मिळणारा, पैशाच्या वा अन्य सामग्रीच्या स्वरूपातील लाभ. शारीरिक किंवा मानसिक श्रम, व्यापार, भांडवल गुंतवणूक यांसारख्या आर्थिक कृतींतून व्यक्तीला वा कंपनीला उत्पन्न मिळते. श्रम व भांडवलावरील मालकी हे उत्पन्न मिळविण्याचे दोन मार्ग आहेत. स्थूलमानाने रोजगारीपासून मिळणारे म्हणजेच श्रमजन्य आणि मालमत्तेपासून मिळणारे, असे उत्पन्नाचे दोन प्रकार पाडता येतात. श्रमजन्य उत्पन्नात वेतनाचा समावेश होतो. मालमत्तेपासून मिळणाऱ्या उत्पन्नात खंड, व्याज व नफा यांचा अंतर्भाव होतो.
राष्ट्रीय उत्पन्नाच्या निर्मितीत भूमी, मजूर, भांडवल व प्रवर्तक हे चार घटक सहभागी असतात. या उत्पादक घटकांच्या सेवेचे मोल अनुक्रमे खंड, वेतन, व्याज व नफा या स्वरूपात केले जाते. निरनिराळ्या प्रकारची अशी जी उत्पन्ने प्रत्येक व्यक्तीला मिळत असतात, त्यांची बेरीज केली म्हणजे त्या व्यक्तीचे वैयक्तिक उत्पन्न किती ते समजते.