India Languages, asked by Anjalivaghat, 2 months ago

शेती व समाज निर्मितीसावा सहसंबंध कसा आहे?खेती व समाज निर्मिती ​

Answers

Answered by rajraaz85
0

Answer:

सुरुवातीच्या काळात मनुष्य हा नेहमी एका जागेहून दुसर्‍या जागी स्थलांतर करत असे. हळूहळू तो एकत्र राहू लागला. ज्या ठिकाणी पाण्याचे स्त्रोत उपलब्ध होते त्या ठिकाणी तो मुक्काम करू लागला. आणि त्यामुळेच आपल्याला असे समजते की बहुतेक गाव ते नदीकिनारी किंवा तलावा किनारी वसलेले आहेत. नदीकिनारी वस्ती केल्यानंतर आणि पाणी उपलब्ध असल्यामुळे मनुष्य हा शेतीकडे वळला. वेगवेगळ्या प्रकारचे बी-बियाणे शेतीत टाकून त्याचे उत्पन्न घेऊ लागला.

जसजसे शेतीतून वेगवेगळे उत्पन्न येऊ लागले तसतसे समाजातील वेगवेगळे घटक तयार होऊ लागले. शेतीतून उत्पन्न काढणारा शेतकरी झाला तर शेतमालाला बाजारात जाऊन विकणारा व्यापारी झाला.

शेतातून आलेल्या माला पासून वेगवेगळ्या वस्तू बनवणारे लोक एकत्र येऊ लागले. कापसापासून कपडे बनवणारे,मातीपासून मडकी बनवणारे, कातडी पासून चप्पल बनवणारे, शेती साठी लागणाऱ्या प्राण्यांपासून वेगळे छोटे छोटे उद्योग धंदे सुरू झाले. दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन असे वेगवेगळे व्यवसाय सुरू झाले. अशा प्रकारे शेती आणि समाज निर्मितीचा खूप जवळचा संबंध आहे.

Similar questions