शेतकरी जगाचा पोशिंदा( निबंध )
Answers
"शेतकरी जगाचा पोशिंदा"
भारत शेतीप्रधान देश आहे. भारताची भौगोलिक परिस्थिती भिन्न आहे आणि त्यातली पिकही भिन्न आहेत. सवाशे कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला बाहेरून माल आयात करणं आणि त्याचं विभाजन करणं कठीण होईल.
शेतकरी आपल्या आयुष्यात खूप कष्ट करतो. त्याचे शेत त्याच्या साठी जीव की प्राण असते. शेती करून तो आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न सोडवत असे.
सकाळी लवकर उठून, शेती नांगरणे, बी बियाणे रोवणे, त्या नंतर त्यांना पाणी देणे आणि संध्याकाळी घरी परतून आराम करणे हे शेतकऱ्याचे रोजचे काम असते. शेतकऱ्याचे पोट त्याच्या शेतीवर चालते. आणि आपले पोट देखील त्यामुळेच भरते.
शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे. आणि विचार करा शेतकरी जर शेती करणार नाही तर पिक नाही, धान्य नाही, भूकबळी जातील आणि देशाचा विकास थांबेल, म्हणून माती तिथे शेती करायलाच हवी. म्हणून कष्टकरी शेतकरी हवाच! आणि म्हणूनच शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.