India Languages, asked by ashwinigarud2, 7 months ago

शेतकर्‍याचे आत्मवृत्त$​

Answers

Answered by hy080420
4

Answer:

शेतकर्याचे आत्मवृत्त

सकाळीच सावकाराची माणस चांदीला ओढत घेउन गेली. चार अजाण पोर, एक खपाटीला गेलेल म्हातर पोट आणि हातावर हात धरुन बसण्याखेरिज काहिच करु न शकणारे आम्ही दोघ. चांदीला सगळ्यांची काळजी. एकच दुभती गाय, पण ती ही आज नेली.

पाच वर्ष झाली, बियाण आणायलाहि हातात रक्कम शिल्लक नव्हती आणि सावकाराची पायरी चढावी लागली. तसा माझा फाटका  संसार, ठिगळ जोडायला सावकाराच तोंड बघावच लागत. पण यावेळी निकड जरा जास्त होती. आंगठा लाउन पैसे उचलले, अजुन हिशोब मिटत नाही. व्याजाची रक्कमच फिटली नाही अजूनही. आता आम्ही अडाणी, आकडेमोड जमणार कशी. दोन वेळच पोटात ढकलायला काहि शिल्लक नाही. अक्षर गिरवायची हौस परवडणार कशी.

पोर समजुतदार मोठी धाकट्यान्ना सांभाळतात. त्यांच्या आईला चुलीवर मदत करतात. पण शिक्षण हव. आमच्यासारखी गुलामगिरी नको.

आमच बेभरवशाच जगण. आजानी खपुन जमिनीचा तुकडा घेतला. त्यावर जेमतेम भागायच, पण जमिन आपली होती. पुढे बापाचे हात राबराब राबले पण नशिबाची साथ नाही. तीन वर्ष दुष्काळानी पाण्याचा थेंब बघु दिला नाही. शेवटी डोळ्यातली आसव ही संपली. होती-नव्हती जमीन गेली. आता दिवसाच्या मजुरीवर पोट.

सरकारची लोक वर्षातुन एकदा येतात. एखादा हंडा, एखाद लुगड हातात पडत आणि भरिला ढिगभर नुसती स्वप्न. तरी इमान सोडल नाही. या मातीतला जन्म आमचा, तिचीच सेवा घडावी. हे सोडुन शहरात काम शोधायला गेलो नाही.

आज ना उद्या पाझर फुटेल नशिबाला. पोर आताशा अंगणवाडीत जातात. एक ताई समाजसेवा म्हणुन लेकरान्ना शिकवते. दोन मुठ तांदुळ तिला नेउन देतो. अशी देव माणस जगायला हवी.

यंदाच्या वर्षीचा दुष्काळ खूप भीषण. आठ वर्षापूर्वी परत मिळवलेला जमिनीचा तुकडा पावसाची वाट बघुन थकला. बाजुच्या शेतावर मजुरीच काम मिळेना. कधी कधी  जीव नकोसा होतो.  परवा खुंटीवरचा दोर उचलुन झाडावर बांधुन आलो. पण हे हात हरले तर मग तुमची पोट भरणार कशी? हे, त्याच वेळी मनात आल आणि पाय माघारी फिरले ते कायमचे. आता  भविष्य आणखी कितीही भेगाळल तरी हे हात राबतील. तुमच्या तोंडात घास द्यायचा वसा असाच चालू राहिल.

"दोन हातानी, विश्वाला रांधायची होती भूक

पोर तरिही रहातील उपाशी हीच रुखरुख"

प्रसन्न तुलाच भूमाता  

पांग फेडिलेस सर्वार्था  

प्राणीमात्रांचा कैवारी तू  

तूच अमुचा अन्नदाता

सुखे पेरलिस आसवे  

मोत्यांचे फुलतील ताटवे  

घन आनंदच बरसतील  

दु:स्वप्न संपु दे आता  

प्राणीमात्रांचा कैवारी तू  

तूच अमुचा अन्नदाता

 .........

Explanation:

Mark as brainlest

Similar questions