शेतकऱ्याचे आत्मवृत्त in marathi
please answer
I will make you brainliest
Answers
आमच्या गावाच्या जवळपास मोठी नदी. लहानसहान नद्यांना पाणी असतं, पण तेही पावसावरच अवलंबून. उन्हाळ्यात त्यापण आटून जातात त्यामुळे मृगाचं नक्षत्र आलं की, आम्हां शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागतात. कुठ दिसतोय का आमचा काळा विठोबा ! म्हणजे काळा ढग हो ! शेत नागरून ठेवायची , काटकूट काढायचं ढेकळं फोडायची आणि पावसाची वाट बघत रहायचं. अंग उन्हात नुसतं भाजून निघायचं, पण पाण्याचा पत्ताच नही. चार-चार पाच-पाच कोसावरून बाया पिण्यासाठी पाणी आणतात.
मग कधीतरी अवचित मळभ येतं. अंग गदगदून निघत सोसाट्याच वारं सुटत. इतक्यात पावसाचे थेंब पटपट गळू लागतात.क्वचित कधीतरी गारा पडतात आणि गारांनी अंगण भरून जातं. सारा गाव-लहानमोठी म्ह्तारीकोतारी त्या पावसात न्हाऊन निघतात पावसात फक्त शरीरच भिजतात , असं नाही; तर मनही निवतात.
आता शेतीला लागायला हवं भिजलेल्या जमिनीत बी-बियाण टाकायला हवं. पाऊसराजने अशी कृपा केली की रोपं तरारून येतात. पण सगळं काही अवलंबून त्या पावसावर. तेवढ्यात येईल ते पीक, मिक्तील ते दाने.त्यावर सगळं वर्ष काढायचं, हेच आम्हा कोरडवाहू शेतकऱ्याच नशीब ! पोळा झाला की पाऊस सरला. उरलेल्या आठ महिन्यांत दुसरी पिक घेता येत नाही. कमी पाण्यावरची नाचणी वरईसारखी पिकं घ्यावी लागतात. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्याच्या नशिबी कायमचं दारिद्र्य ! कायमची उपासमार ! काय करणार ? मग सरकारकडे उंबरठे झिजवावे लागतात. भरमसाठ वयाने पैसे घ्यावे लागतात. मग ते फेडता फेडता अर्धा जीव जातो
आमच्या गावापासून बऱ्यापैकी. अंतरावरून मांजरी नदी वाहत. इकडच्या भागातील नद्यांमध्ये ती बऱ्यापैकी मोठी आहे. या नदीवर धरण बांधलं आणि काल्वांच्या मदतीने तीच पाणी आमच्या गावात खेळवलं तर गावाचा किती फायदा होईल !आम्ही पण दोन पिककाढू सकू,बागायत करू सकू ; पण हे आमच मनोगत पूर्ण होणार ? परमेश्वर आणे !
Answer:
"लोकहो, मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे. मी या भूमीचा पुत्र आहे. ही माती माझी आई आहे. वर्षानुवर्षे शेतात खपून, घाम गाळून मी धान्य पिकवतो. मी तुम्हां सर्वांचा नम्र सेवक आहे. आज मी तुमच्यापाशी माझे मनोगत व्यक्त करणार आहे.
आपला हा देश कृषिप्रधान आहे. 'कसेल त्याची जमीन' असा कायदा झाला. हेतू हा की, शेतात राबणारा शेतकरी जमिनीचा खऱ्या अर्थाने मालक व्हावा. शेतकऱ्यांची सावकाराकडून होणारी पिळवणूक बंद करण्यात आली व बँकांमार्फत शेतकऱ्यांना मदत देऊ करण्यात आली. या साऱ्या गोष्टींचा गाजावाजा भरपूर झाला. पण सामान्य शेतकऱ्यांपर्यंत या साऱ्या योजना खरोखरीच पोहोचल्या आहेत का, याची कुणी कधी खात्री करून घेतली आहे का? त्यातच निसर्गाचा लहरीपणा, कधी अवर्षण तर कधी अतिवर्षाव.
"हल्ली खेडेगावांतून धनदांडग्यांचा, म्हणजेच सधन शेतकऱ्यांचा एक नवा वर्ग निर्माण झाला आहे. सारे फायदे हा वर्ग गिळंकृत करत आहे. हेच लोक वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून सरकारी सोयीसुविधा मिळवतात, मानसन्मान पटकावतात आणि गरीब शेतकऱ्यांवर अन्याय करतात. त्यामुळे धनिक शेतकरी अधिक श्रीमंत होत आहेत; तर गरीब शेतकरी हा अधिकच कंगाल जीवन जगत आहे. गरीब शेतकऱ्याने पिकवलेल्या मालाला काही वेळा योग्य भाव येत नाही. मग कर्जफेड कशी करणार? हप्त्यांचा तगादा लागतो. शेवटी काहीजण आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात, कर्जबळी ठरतात. "स्वत:चे शेत नसलेल्या मजुराचे हाल तर विचारूच नका. त्याला धड मजुरीदेखील दिली जात नाही. त्याला वेठबिगारासारखे राबवून घेतले जाते. पावसाळ्यात तर हे शेतमजूर कसे.जगतात, याचा तुम्ही कधी विचार केला आहे ? सारे राष्ट्र ज्यांच्या कष्टावर जगते तो गरीब शेतकरी उपाशी आहे, याची देशवासीयांना कल्पनाही नसेल.
"या सामान्य शेतकऱ्यांकडे व शेतमजुरांकडे सरकारने तसेच शहरी नागरिकांनी देखील लक्ष देणे आवश्यक आहे. खरे भूमिपुत्र असलेले आम्ही गरीब आहोत. स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून आम्हांलाही मानाने जगू दया. 'जय जवान, जय किसान' ही घोषणा सार्थ होण्यासाठी योग्य असे जीवन आम्हा सामान्य किसानांना लाभू दया, एवढीच आमची मागणी आहे."