शेतकऱ्याचे आत्मवृत्त निबंध मराठी
Answers
शेतकर्याचे आत्मवृत्त
सकाळीच सावकाराची माणस चांदीला ओढत घेउन गेली. चार अजाण पोर, एक खपाटीला गेलेल म्हातर पोट आणि हातावर हात धरुन बसण्याखेरिज काहिच करु न शकणारे आम्ही दोघ. चांदीला सगळ्यांची काळजी. एकच दुभती गाय, पण ती ही आज नेली.
पाच वर्ष झाली, बियाण आणायलाहि हातात रक्कम शिल्लक नव्हती आणि सावकाराची पायरी चढावी लागली. तसा माझा फाटका संसार, ठिगळ जोडायला सावकाराच तोंड बघावच लागत. पण यावेळी निकड जरा जास्त होती. आंगठा लाउन पैसे उचलले, अजुन हिशोब मिटत नाही. व्याजाची रक्कमच फिटली नाही अजूनही. आता आम्ही अडाणी, आकडेमोड जमणार कशी. दोन वेळच पोटात ढकलायला काहि शिल्लक नाही. अक्षर गिरवायची हौस परवडणार कशी.
पोर समजुतदार मोठी धाकट्यान्ना सांभाळतात. त्यांच्या आईला चुलीवर मदत करतात. पण शिक्षण हव. आमच्यासारखी गुलामगिरी नको.
आमच बेभरवशाच जगण. आजानी खपुन जमिनीचा तुकडा घेतला. त्यावर जेमतेम भागायच, पण जमिन आपली होती. पुढे बापाचे हात राबराब राबले पण नशिबाची साथ नाही. तीन वर्ष दुष्काळानी पाण्याचा थेंब बघु दिला नाही. शेवटी डोळ्यातली आसव ही संपली. होती-नव्हती जमीन गेली. आता दिवसाच्या मजुरीवर पोट.
सरकारची लोक वर्षातुन एकदा येतात. एखादा हंडा, एखाद लुगड हातात पडत आणि भरिला ढिगभर नुसती स्वप्न. तरी इमान सोडल नाही. या मातीतला जन्म आमचा, तिचीच सेवा घडावी. हे सोडुन शहरात काम शोधायला गेलो नाही.
आज ना उद्या पाझर फुटेल नशिबाला. पोर आताशा अंगणवाडीत जातात. एक ताई समाजसेवा म्हणुन लेकरान्ना शिकवते. दोन मुठ तांदुळ तिला नेउन देतो. अशी देव माणस जगायला हवी.
यंदाच्या वर्षीचा दुष्काळ खूप भीषण. आठ वर्षापूर्वी परत मिळवलेला जमिनीचा तुकडा पावसाची वाट बघुन थकला. बाजुच्या शेतावर मजुरीच काम मिळेना. कधी कधी जीव नकोसा होतो. परवा खुंटीवरचा दोर उचलुन झाडावर बांधुन आलो. पण हे हात हरले तर मग तुमची पोट भरणार कशी? हे, त्याच वेळी मनात आल आणि पाय माघारी फिरले ते कायमचे. आता भविष्य आणखी कितीही भेगाळल तरी हे हात राबतील. तुमच्या तोंडात घास द्यायचा वसा असाच चालू राहिल.
"दोन हातानी, विश्वाला रांधायची होती भूक
पोर तरिही रहातील उपाशी हीच रुखरुख"
प्रसन्न तुलाच भूमाता
पांग फेडिलेस सर्वार्था
प्राणीमात्रांचा कैवारी तू
तूच अमुचा अन्नदाता
सुखे पेरलिस आसवे
मोत्यांचे फुलतील ताटवे
घन आनंदच बरसतील
दु:स्वप्न संपु दे आता
प्राणीमात्रांचा कैवारी तू
तूच अमुचा अन्नदाता
.........भावना
Answer:
"पुढच्या आठवड्यात माझा इथला अन्नाचा शेर संपणार | मी गावाला जाणार, तुम्हा लोकांसारखी आम्हा श्रमिकांच्या जीवनात 'पेन्शन' नसते. हातपाय थकले की थांबायचे । गेली पंचावन्न साठ वर्षे ही मोलमजुरी चाललीय। आता मी सत्तरी गाठली. ओझे उचलले की मान डगडगते, पाय अडखळतात. एक दोनदा सामान घेऊन जाताना पडलोही. उगाच लोकांच्या चीजवस्तूंचे नुकसान नको, म्हणून मी आता गावाला परतायचा निर्णय घेतला आहे.
वयाच्या १० व्या वर्षी मी गावाकडून शहरात आलो. वाटले, कुठे आधार मिळेल. चार बुके शिकायला मिळतील. एका गावकऱ्याच्या ओळखीने एका शेटजीकडे कामाला राहिलो. खायला प्यायला भरपूर मिळे, पण पुस्तकाला हात लावला की शेटजींना संताप येत असे. म्हणून ते काम सोडले आणि हमाली सुरू केली. रात्रीच्या शाळेत नाव घातले. सातवीपर्यंत शिक्षण झाले, पण कोठे नोकरी मिळाली नाही. मग एकदा सुरू केलेली हमाली आजतागायत चालली आहे.
"सुरुवातीला हमाल संघटित नव्हते, तेव्हा मजुरीसाठी फार झगडावे लागत असे. लोक अवजड ओझी उचलायला लावत, पण पैसे देताना फार काचकूच करत, आता मजुरांची संघटना झाली आहे. त्यामुळे ओझी उचलण्याचे दर ठरले आहेत. एखादा भला माणूस खूश होऊन जास्त मजुरी देतोही; नाही असे नाही. "एवढे कष्ट करून हमालाच्या वाट्याला काय येते? तर खाणावळीतले थंडगार जेवण, फलाटावर झोपणे, फलाटावरच स्नान, रात्री तेथेच भजन करतो. तेवढेच मनाला बरे वाटते !
वर्षातून पंधरा दिवस गावात जातो. गावात एक वाडवडिलांचे घर आहे. त्याचीच डागडुजी करून माझी माणसे तिथे राहतात. माझ्या मुलाबाळांची लग्नेही झाली. मुलगे गावाकडेच काम करतात. आता माझी नातवंडे गावी शिकत आहेत. जेवढे कष्ट आम्ही करतो, तेवढे फळ मिळते का? उन्हापावसात धड निवाराही नाही.
काही दिवसांपूर्वी एका स्टेशनवरची कचेरीची इमारत पडली तेव्हा त्याखाली काही हमालच गाडले गेले । अशी आमची स्थिती । वाईट एकाच गोष्टीचे वाटते की, समाजातील इतर जनांचे या श्रमिकांकडे लक्ष नसते. उलट, 'हमाल दे धमाल' आणि 'कुली' अशा सिनेमांतून हमालांचे विपरीत, हास्यास्पद चित्र रंगवले गेले आहे. आज आयुष्याच्या अखेरी माझी ओळख काय?
'मी एक हमाल!' आयुष्याची उरलेली वर्षे निवांतपणे जावीत, एवढीच परमेश्वराकडे मागणी।"