शेतकऱ्यांना समोच्च रेषा नकाशांचा उपयोग कसा होईल?
Answers
Answered by
5
शेतकऱ्यांसाठी समोच्च रेषा नकाशांचा उपयोग:
Explanation:
- समोच्च रेषा नकाशे शेतकऱ्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतात. शेतकरी त्यांचा वापर करून जमिनीच्या क्षेत्राबद्दल नियोजन करू शकतो.
- समोच्च रेषा नकाशा वापरून त्याला जमिनीच्या उताराचा अभ्यास करता येईल. तसेच उतारावरून वाहणाऱ्या पाण्याच्या वेगाबद्दल अंदाज लावता येईल.
- याच्या उपयोगाने शेतकऱ्याला सधन शेतीसाठी सखल जमीन व वृक्षारोपण शेतीसाठी डोंगराळ प्रदेशाची निवड करण्यास मदत होते.
- याच्या उपयोगाने शेतकरी जमिनीचे वेगवेगळे वैशिष्ट्य जसे जमिनीचा आकार व उतारा, जमिनीची ऊंची, जमिनीच्या उताऱ्याची दिशा व जमिनीतील पाण्याचा निचरा याबद्दल माहिती मिळवू शकतो.
Similar questions