India Languages, asked by PragyaTbia, 1 year ago

शिवाजी महाराजांवर निबंध लिहा

Answers

Answered by Mandar17
7

मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना मी नमस्कार करते.

आज मला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याचे भाग्य लाभले याचा मला अभिमान वाटतो. कारण छत्रपती शिवाजी महाराज नुसते महाराष्ट्राचे शान नव्हे तर पूर्ण देशाचे अभिमान होते. महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरी किल्ल्यावर झाला. मां जिजाऊंच्या तालमीत वाढलेले शिवाजी महाराज जनतेसाठी लढले. एक महान राष्ट्रयोद्धा ज्याने गुलामांसारखे जगणे नाकारले आणि महान अशा मराठा समाजाला जन्म दिला. एक शूरवीर योद्धा ज्याच्याकडे प्रशासकीय कुशलता, चाणाक्षवृत्ती, आधुनिक लष्करी तसेच डावपेचात पारंगतपणा व दूरदृष्टि होती. शिवाजी महाराजांनी 1645 पर्यंत अदिलशाहाच्या पुणे प्रदेशाच्या आजुबाजूचे चाकण, कोंढाणा, तोरणा, सिंहगड आणि पुरंदर या किल्ल्यांचा ताबा मिळविला. शिवाजी महाराजांच्या या यशामुळे आदिलशहा अस्वस्थ झाला. महाराजांनी आदिलशहाचा प्रत्येक डाव उधळून लावला. 6 जून 1674 मध्ये रायगडावर महाराजांचा राज्यभिषेक झाला. 3 एप्रिल 1680 रोजी रायगड किल्ल्यावर आजारामुळे राजे अनंतात विलीन झाले. तरीपण आज महाराज प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहतात. म्हणूनच सर्वांनी म्हणा, ‘जय भवानी, जय शिवाजी, जाणता राजा अमर असो.’

Answered by Anonymous

hope it HELPS u ❤️❤️
Similar questions