Art, asked by shubham603571, 11 months ago

श्यामची आई या पुस्तकाचा
लेखन शैली​

Answers

Answered by kharpaskhushi
5

Answer:

श्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेली मराठी आत्मकहाणी आहे. नाशिकच्या कारागृहात असताना फेब्रुवारी ९, इ.स. १९३३ रोजी त्यांनी या पुस्तकाच्या लिखाणास प्रारंभ केला. या पुस्तकाच्या ३ लाखांपेक्षा अधिक प्रती खपल्या आहेत. इ.स. १९५३ साली या पुस्तकावर आधारित असलेला 'श्यामची आई' याच नावाचा चित्रपटदेखील पडद्यांवर झळकला. प्रल्हाद केशव अत्रे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

मातेबद्दलच्या असणार्‍या प्रेम, भक्ति व कृतज्ञता यांच्या अपार भावना ’श्यामची आई’ या पुस्तकात मांडलेल्या आहेत. नाशिकच्या तुरुंगात साने गुरूजींनी या कथा ९ फेब्रुवारी, इ.स. १९३३ रोजी लिहावयास सुरूवात केल्या आणि १३ फेब्रुवारी, इ.स. १९३३ रोजी पहाटे त्या संपविल्या..

Explanation:

Similar questions