World Languages, asked by aaliya02008gamilcom, 22 days ago

शब्दकोशची काय काय उसते नै लिहा.​

Answers

Answered by shridharpanada
1

शब्दकोश

एखाद्या भाषेतील वापरत असलेल्या तसेच वापरातून गेलेल्या अशा यच्चयावत शब्दांचा संग्रह, त्यांच्या अर्थासहित ज्यात केलेला असतो असा संदर्भग्रंथ. मुद्रित वाङ्‌मयातील शब्दांबरोबरच वाक्संप्रदाय, म्हणी यांचाही त्यांत अंतर्भाव होतो. शब्दांचा अर्थ समजावा आणि जिज्ञासूची शब्दशक्ती वाढावी, हा एक हेतू शब्दकोशरचनेमध्ये असतो. शब्दांच्या अर्थांचे संकेत निश्चित व स्थिर होण्याचे कार्य शब्दकोशामुळे साधते आणि त्यायोगे भाषिक व्यवहार सुलभतेने होऊ शकतात.

१) सर्वसमावेशक किंवा बृहद-शब्दकोश. यात तत्त्वतः आणि सामान्यतः भाषेतील वापरातील किंवा नष्टप्राय अशा यच्चयावत शब्दांचा संग्रह केलेला असतो. अशा शब्दकोशाला मर्यादा असते, ती व्यावहारिक स्वरूपाची.

(२) विशिष्ट भाषाभेदांचे शब्दकोश, उदा., ग्रामीण, प्रादेशिक, व्यावसायिक, मुलांचे स्त्रीविशिष्ट, बोली-उपभाषांचे, अशिष्ट शब्दांचे इ. (३) मर्यादित उद्दिष्टाने तयार केलेले शब्दकोश : उदा., शालेय शब्दकोश किंवा सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने नित्योपयोगी असे सुटसुटीत, आटोपशीर शब्दकोश.

(४) समानार्थी, किंवा विरूद्धार्थी शब्द देणारे कोश.

(५) एकेका ग्रंथातील शब्दांचा अर्थासह केलेला संग्रह. उदा., ज्ञानेश्वरीचा शब्दकोश, बा. भ. बोरकरांच्या भावीण कादंबरीला जोडलेला गोमंतकी शब्दाचा कोश. (६) व्युत्पत्तिकोश, यात शब्दाची व्युत्पत्ती स्पष्ट केलेली असते. शब्दाच्या अर्थाच्या इतिहासक्रमातील बदल, त्याचा विकासक्रम आणि वर्तमानकाळातील अर्थ इ. माहिती यात आढळते.

(७) परिभाषा कोश. वेगवेगळ्या ज्ञानशाखांतील संज्ञा, परिभाषा यांचा अर्थ अशा कोशात असतो. उदा., मानसशास्त्रीय परिभाषा कोश, साहित्यसमीक्षा परिभाषा कोश.

(८) उच्चारकोश : यात प्रत्येक शब्दाचा (नेहमी वापरल्या जाणाऱ्या विशेष नामाचाही) उच्चार दिलेला असतो; उदा., डॅन्यल जोन्स यंचे इंग्लिश प्रोनान्सिंग डिक्शनरी.

Similar questions