India Languages, asked by stepinshoe2131, 6 hours ago


शलांमुळे आणि भाषेमुळे तुमच्या
दनदिन जीवनावर काय परिणाम
होतो
ते
तुमच्या भाषत लिहा

Answers

Answered by anjalitalanje199
0

Answer:

भाषा हे संवाद साधण्याचे एक अतिशय प्रभावी साधन आहे. भाषेमुळे आपले सर्व व्यवहार अगदी सहज पार पडतात. आपल्या अवतीभवती घडणाऱ्या गोष्टी आपल्याला भाषेच्या माध्यमातूनच समजतात. उदा. वर्तमानपत्र, टीव्ही, शालेय अभ्यास, अवांतर वाचन इत्यादी.

समाजाचा विकास करण्याचे काम भाषा करते. शालेय, महाविद्यालयीन जीवनात केला जाणारा अभ्यास हा भाषेच्या माध्यमातूनच केला जातो. भावना व्यक्त करणे ही माणसाची मूलभूत गरज आहे. भाषेमुळेच मनुष्य भावना व्यक्त करू शकतो. त्यामुळे, भाषेचे दैनंदिन व्यवहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे.

Similar questions