Hindi, asked by smansoor7325, 10 months ago

Shalechi ghanta spech in marathi

Answers

Answered by Anonymous
3

Answer

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

नवा कोरा गणवेश, खांद्यावर नवे दप्तर आणि नव्या वर्गाबद्दलची चेहऱ्यांवर न लपणारी उत्सुकता अशा उत्साहपूर्ण वातावरणात नव्या शैक्षणिक वर्षाची घंटा बुधवारी शाळांमध्ये वाजली आणि विद्यार्थ्यांची पावले आपल्या वर्गांकडे वळाली. गेल्या दीड महिन्यांपासून शांत असलेले शाळेचे प्रांगण पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तर काही शाळांत गुलाबाचे फूल देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. अनेक शाळांनी पुस्तकवाटपासह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. काही शाळांनी स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छेतचा संदेश देण्यात आला.

नवा गणवेश, नवे दप्तर घेऊन विद्यार्थी पालकांबरोबर शाळेमध्ये येत होते. शाळेच्या प्रवेशाद्वाराजवळ स्वतः शिक्षक फुले देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करताना दिसत होते. तर दुसरीकडे, पहिल्यांदाच शाळेची पायरी चढणाऱ्या बालवर्गातल्या विद्यार्थ्यांचे रडणे-ओरडणे, शाळेचे शिपाई पिटाळत असूनही गेटजवळच घुटमळणारी पालकांची पावले असे चित्रही शाळा-शाळांत दिसत होते.

 

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठ

Similar questions