Shetisathi vaprali janari khate ani tyanche parinam spasht kara
Answers
Answer:
सर्व प्रकारच्या पिकांसाठी व फळ झाडे आणि सर्व प्रकारच्या वनस्पति साठी नत्र, स्फुरद, पालाश आणि इतर १६ प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्ये लागतात. ती नैसर्गिक रित्या मिळतात. जी जमीन, हवा व सुर्यप्रकाशाद्वारे वनस्पतींना मिळतात व वनस्पति ते मिळवून त्यांचा जीवनकाळ पूर्ण करून निसर्ग व जिवाना जगण्यास मदत करतात व त्यानुसार निसर्ग तेवढेच जीव जगवत असतो म्हणजेच संख्या नियंत्रणात ठेवतो. पण आता मानवी लोकसंख्या अनियंत्रित झाली आहे व त्यानुसार अन्नाची मागणी वाढली आहे. निसर्गाचे चक्र विस्कळीत झाले आहे व ही अन्नधान्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कृत्रिमरीत्या जास्तीचे अन्नधान्य पिकविण्यासाठी वरील प्रकारची कृत्रिम खते देऊन जास्तीत जास्त अन्नधान्य पिकविले जाते आहे. ती काळाची गरज आहे पण त्यामुळे निसर्ग चक्र बिघडले आहे/संतुलन बिघडले आहे व जमीन तसेच पर्यावरण यांचा ऱ्हास होतो आहे व मानव व इतर प्राणी यांचे आरोग्य पण बिघडले आहे. नैसर्गिकरित्या थोडया प्रमाणात जमिनीचा कस वाढविता येतो जो की पूर्वीच्या काळी शेतीतील कचरा प्राण्यांचे मलमूत्र इत्यादी वापरून शेती केली जात असे. आता त्यामध्येही संशोधन होत आहे व शेतीची सुपीकता वाढविली जाते आहे.
वर लिहिल्या प्रमाणे रासायनिक खते जमिनीचा कस कमी करीत आहेत तसेच अति अन्नद्रव्यामुळे पिकांवरील कीड वाढते आहे व ते नियंत्रित करण्यासाठी विषारी औषधे वापरली जातात. त्यांचा अंश वनस्पती व अन्न धान्यात राहून मनुष्य व इतर प्राण्यांच्या शरीरात जात आहे. त्यामुळे रोग व व्याधींचे प्रमाण वाढलेले आहेत. एकंदरीत असे दुष्ट चक्र निर्माण झाले आहे. तेंव्हा ही कृत्रिम/रासायनिक खते अपाय कारक आहेत पण सध्यातरी कोणत्याही सरकारांकडे ह्याला पर्याय नाही. त्यामुळे सरकारे अनुदान देऊन ह्यांच्या वापरास हातभार लावत आहे.
So these inputs are very very dangerous to human and all animals and nature too.
Explanation: