Shetkari sampavar Gela tar nibandh in Marathi
Answers
■■ शेतकरी संपावर गेला तर!!■■
शेती आपल्या देशाचा कणा आहे आणि शेतकऱ्याला 'अन्नदाता' असे समजले जाते.शेतकरी सगळ्यात महत्वाचे काम म्हणजेच आपल्यासाठी अन्न पिकवण्याचे काम करतो.
अशा वेळी शेतकरी संपावर गेला तर लोकांना फार समस्या होतील.शेतकरी संपावर गेला तर आपल्याला शेतात दिवस रात्र काम करावे लागेल,तेव्हा जाऊन आपल्याला खायला अन्न मिळेल.तेव्हाच आपल्याला अन्नाचे महत्व कळेल.
शेतकरी संपावर गेला तर, आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर फार वाईट परिणाम होईल कारण बर्याच कृषी उत्पादनांची निर्यात बाहेर देशांमध्ये केली जाते.शेतकरी केवळ खाता येईल अशी पिके पिकवत नाही,तो विविध उद्योगांमध्ये वेगवेगळ्या कामांसाठी वापरले जाणारे पिके तयार करतो.
शेतकरी दिवसभर शेतात खूप मेहनत करतो.कडक उन्हात,पावसातसुद्धा तो शेतामध्ये राबत असतो.बी पेरल्यापासून ते अन्न पूर्णपणे तयार होईपर्यंत तो प्रत्येक पीकाची खूप काळजी घेत असतो.त्याचे काम खूप कठीण असते.
अशा वेळी,शेतकरी संपावर गेला तर खूप भयंकर स्थिती निर्माण होईल.