Shetkaryache aatmkatha
Answers
जय जवान जय किसान असं श्री लाल बहादुर शास्त्री म्हणाले होते पण याच शेतकऱ्याची व्यथा एकूण तुमचे मन दु:खी झाल्याशिवाय राहणार नाही. याच जगाच्या पोशिन्द्याला आज आत्महत्या करण्याची वेळ का आली? स्वतः दिवस रात्र शेतात राबणारा माझा शेतकरी प्रेमाने, मनापासून संपूर्ण बळ एकवटून पिक घेतो. कधी दुष्काळ, कधी अतीवृष्टी, ही निसर्गनिर्मित संकटे त्याचापुढे कायम आ वासून उभे राहतात तरी माझा शेतकरी डगमगत नाही तो सह्याद्रीप्रमाणे कणखर उभा असतो, या संकटावर मात करून तो मायेने लावलेले, जपलेले पिक घेतो पण अजून त्याची परीक्षा संपलेली नसते. शाळेत शिकणाऱ्या मुलाला देखिल वर्षात फक्त दोनदाच परीक्षेला सामोरे जावे लागते पण शेतकऱ्याला प्रत्येक क्षणाला परीक्षेला सामोरे जावे लागते. एक समस्या सुटली कि दुसरी त्याचासमोर आ वासून उभी असते
Answer:
शेतकऱ्याची आत्मकथा
आपण एका शेतकऱ्याचे मनोगत जाणून घेणार आहोत.
नमस्कार मित्रांनो, माझे नाव सखाराम आहे. माझे वय ५५ वर्ष आहे आणि मी शेती करतो. म्हणजेच मी एक शेतकरी आहे. होय, मी एक शेतकरी आहे. माझे वडील व आजोबाही शेतकरीच होते. आमचा पिढ्यानपिढ्या शेतीचा व्यवसाय आहे.
माझ्या कुटुंबात मी, माझी पत्नी, माझी दोन मुले आणि माझी आई आहेत. माझ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची संपूर्ण जबाबदारी माझ्याच खांद्यावर आहे. शेतीचा व्यवसाय करूनच मी माझ्या कुटुंबाचे पालनपोषण करतो आणि माझ्या मुलांचे शिक्षण करतो.
शेतीची कामे ही मुख्यतः पावसावर अवलंबून असतात. पाऊस वेळेत आला तर कामे चालू होतात परंतु पाऊस कमी झाला किंवा प्रमाणापेक्षा जास्त झाला तर हाच पाऊस आम्हाला शेतीसाठी घातक ठरतो. लावणी केल्यानंतर जर अवेळी पाऊस आला तर माझ्या आणि माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे खूप नुकसान होते. म्हणजेच प्रत्येकवेळी ओला दुष्काळ किंवा सुखा दुष्काळ दोन्ही ही माझ्यासाठी घातकच आहेत...
Explanation:
वरील निबंध संपूर्ण वाचण्यासाठी कृपया आमच्या ब्लॉग ला भेट दया.
www.sopenibandh.com