short essay on dussehra in marathi
Answers
Dussehra celebrated as happiness of Ram and Sita and Ravan Sita from.
दसरा हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस नवरात्रीचा नंतर अश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी साजरा केला जातो. ह्या दिवशी सरस्वती देवीची पूजा केली जाते. ज्ञानाची व कलेची पूजा केली जाते. शास्त्र पूजनही केले जाते.
ह्याच दिवशी प्रभू श्री राम आणि सीता वनवास संपवून परत अयोध्येत आले होते. रावणावर विजय मिळवून आले असल्याने अयोध्येत सगळीकडे जगमगाट होता. आणि म्हणूनच ह्या दिवसाला विजयादशमी सुद्धा म्हणतात.
महाराष्ट्रात आपट्याची पाने 'सोने' म्हणून दिली जातात आणि मोठ्यांचे आशीर्वाद घेतला जातो. भारताच्या अनेक भागात रामायणाचे नाटकीय रूपांतर दाखवले जाते आणि शेवटी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात येते. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या दिवशी आपला आत मधला वाईटपणाचे दहन करून चांगूलपणाचा विजय करावा असे भले मोठे म्हणून गेले आहेत.
अशा प्रकारे दसरा हा आपल्या संस्कृतीचा भाग असून एक बोध देणारा सण आहे.