India Languages, asked by kimm4921, 1 year ago

Short speech on independence day in marathi language

Answers

Answered by omkar123123
4
Take this ur speech u wanted
Attachments:
Answered by fistshelter
5

Answer:माझे सर्व आदरणीय अध्यापक व अध्यापिका, सर्व पालकवर्ग आणि माझे प्रिय विदयार्थी बंधू भगिनींनो माझ्या कडून सर्वांना स्वतंत्रता दिवसाच्या शुभेच्छा.

स्वातंत्र्य दिवस असे प्रामुख्याने संबधित देशाच्या राजकीय स्वातंत्र्य दिवसास संबोधले जाते. भारताचा स्वातंत्र्य दिवस ऑगस्ट १५, १९४७ हा आहे. १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रमुख कार्यक्रम ,नवी दिल्ली येथे लाल किल्याच्या साक्षीने साजरा केला जातो.

१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी, भारत ब्रिटीशांच्या जोखड्यापासून स्वतंत्र झाला. प्रतिवर्ष, १५ ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे राष्ट्रीय पर्व संपूर्ण देशभरात अमाप उत्साहात साजरा केले जाते.

कोणत्याही देशासाठी स्वातंत्र्यदिन म्हणजे एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असतो. या विशेष पर्वणीला, जुलमी ब्रिटिश राजवटीच्या पंज्यापासून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली जाते. सर्वप्रथम व्यापारासाठी म्हणून आलेल्या ब्रिटिशांनी टप्प्याटप्प्याने संपूर्ण भारताचे शासन काबीज केले.१५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीच्या ठोक्यावर भारताने ब्रिटिश राजवटीच्या शृंखला तोडून स्वातंत्र्य मिळवले. ती सबंध देशभरासाठी उत्सवाची रात्र ठरली.१५ ऑगस्ट म्हणजेच भारताने स्वातंत्र्य मिळवलेल्या दिवशी देशभर ध्वजारोहण आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवून स्वातंत्र्यदिन साजरे केले जातात. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर प्रमुख कार्यक्रम असतो. तेथे पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होते आणि तोफांनी ध्वजाला सलामी दिली जाते.

भारताला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्ष झाली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारी, स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.

'At the stoke of the midnight hour, when the world sleep, India will awake to life and freedom. A moment comes but rearly in history, when we step out from old to the new…. India discovers herself again.' - Pandit Nehru.

स्वातंत्र्य दिनाच्या पुर्व संध्येला पंडित नेहरुंनी दिलेल्या या भाषणात भारताने स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्षमयी प्रवास उलगडला आणि त्याबरोबरच भारताने आपलं स्वातंत्र्य परत मिळवल्याचं जगाला सागितलं. भारत जगतील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून ओळखले जाते. भारतात असलेल्या सांस्कृतिक तसेच धार्मिक विविधतेमुळे भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा अनेकांनी भारत हा देश एकसंध राहणार नाही असे भाकित वर्तवले होते. परंतु विविधतेत एकता हेच भारताचे वैशिष्ठय ठरले. भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं म्हटलं जातयं.

भारत ज्या वेगाने प्रगती करत आहे त्या किबंहुना त्याच्या दुप्पट वेगाने भारत विविध समस्यांनी वेढला गेला आहे. प्रश्न पडतो की खरच आपण स्वतंत्र आहोत का? ब्रिटिश राजवटीतून आपण कधीच मुक्त झालो. पण महागाई, दहशतवाद, भ्रष्टाचार, स्वैराचार यात मात्र अडकलो आणि यातून दिवसेंदिवस बाहेर पडणं कठीण होत चाललयं. परदेशियांशी लढणं सोपं आहे पण स्वकियांशी तितकच कठीण.

आपल्याला महान आणि तडफदार नेते, राजकारण्यांचा इतिहास आहे. पण खेद याचा वाटतो की, या इतिहासाची पुनरावृत्ती होत नाहिये. आज आपल्या देशात भ्रष्टाचार एवढा बोकळा आहे की आणखी काही दिवसांनी तो एक शिष्टाचार होतो की काय अशी भिती निर्माण झाली आहेत. स्टॅम्प पेपरपासून ते चारा घोटाळा या सारख्या अनेक घोट्याळ्यात माननीय मंत्री अडकलेले आहेत.

आर्थिक महासत्तेची स्वप्न बघणार्‍या भारतात दारिद्रय रेषेखालील जनेतेला अन्न, निवारा या जीवनाश्यक गोष्टीची भ्रांत आहे. आपल्या तिरंग्यातील तीन रंग शांतता, सामर्थ्य, सुबत्ता यांचे प्रतिक आहेत. भगवा सामर्थ्याचं, पाढंरा शांततेचं आणि हिरवा सुबत्तेचं. आज तिरंगा फडकवताना मनात येतं की खरचं भारतात शांती आहे? महासत्ता बनण्याचे सामर्थ्य आहे? शेतकर्‍यांच्या आत्महत्या होणार्‍या कृषीप्रधान भारतात सुबत्ता आहे? आज स्वातंत्र्य दिन नागरिकांसाठी बॅंक हॉलिडे झाला आहे.

या दिवशी ड्राय डे असुनही पर्यटन स्थळी मदयपींना आवर घालण्यासाठी पोलिस बंदोबस्तात वाढ करावी लागते. खरच स्वातंत्र्याची किंमत कधी कळणार आपल्याला. कदाचित आपण आणखी काही वर्षांनी आपण स्वातंत्र्यदिन धुमाधडाक्यात साजरी करु पण तेव्हा चित्र खरेच पालटले असेल अशी आशा व्यक्त करु या.

'जहाँ डाल डाल पे सोने की चिडिया करती है बसेरा ।

वो भारत देश है मेरा ।'

Explanation:

Similar questions