India Languages, asked by rahulkumar9356, 10 months ago

Speech about best friend by a student of standard 1 in Marathi

Answers

Answered by halamadrid
0

■■माझी सगळ्यात आवडती मैत्रीण(best friend) या विषयावर भाषण:■■

या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांचा मी मनापासून स्वागत करते.आज मी माझ्या सगळ्यात खास मैत्रिणीबद्दल बोलू इच्छिते.

माझ्या सगळ्यात खास मैत्रिणीचे नाव महिमा आहे.ती माझ्या घराजवळच राहते.लहानपणापासून आम्ही एकत्र खेळलो आहोत.

आम्ही एकाच शाळेत होतो आणि आता एकाच कॉलेजमध्ये शिकत आहोत. आम्ही रोज एकत्र कॉलेजला जातो.तिथे खूप मजा करतो.मनातल्या सगळ्या गोष्टी एकमेकींना सांगतो.अभ्यासात एकमेकींना मदत करतो.

महिमा मला नेहमी नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रोत्साहन देत असते. एखाद्या चांगल्या मैत्रिणीसारखी अडचणींमध्ये माझी मदत करते.ती मला वाईट संगतीपासून आणि सवयींपासून दूर ठेवते.

कधी कधी आमच्यामध्ये भांडण होते.पण आम्ही थोड्या वेळातच एकमेकींशी बोलायला लागतो.आमच्या मधील नातं पाहून आम्हाला सगळेजण बहिणी-बहिणी म्हणतात.मला माझी मैत्रीण खूप आवडते.

धन्यवाद!

Similar questions