India Languages, asked by StephenHawking5919, 11 months ago

Speech about boss work in Marathi

Answers

Answered by Hansika4871
0

*Boss Work*

इंजिनीअरिंग वर्क्स ह्या कारखान्यात मी अभियंता म्हणून काम करतो. रोज ९ ते ६ ही माझी कामाची वेळ. कौतुकाची सांगायची गोष्ट अशी की आमच्या कंपनीत आमचे बॉस देखील रोज कारखान्यात येतात. त्यांनी उच्च शिक्षण घेतले आहे व ह्या क्षेत्रात २५ वर्षे त्यांनी अनुभव घेतला आहे. त्यांचे विचार खूप वेगळे आहेत आणि त्यांच्या डोक्यात ज्ञान भरभरून आहे.

ते सकाळी १० वाजता चा आत कंपनीत हजर असतात. सकाळी सकाळी महत्त्वाचे ईमेल् बघितल्यानंतर दिवसभरात कंपनीत काय काय काम व्हायला पाहिजे ह्याचे ते प्लॅन बनवतात. नंतर काल रात्रीच्या कामाचा आढावा घेतात आणि काही अडचण असल्यास निर्णय सुद्धा घेतात.

आमच्या बॉस च्या निगराणी मध्ये कोणीही काही वाईट काम करत नाहीत. सगळे शिस्तीत वागतात आणि माझ्या बॉस चे मला खूप कौतुक वाटते.

Similar questions