India Languages, asked by yogitarajesh1275, 10 months ago

Speech on india in marathi - भारतावर भाषण तयार करा

Answers

Answered by muskanc918
0

Brainly User

भारत माझा देश आहे . माझा देश प्राचीन व महान आहे.

माझ्या देशाच्या उत्तरेला हिमालय आहे . माझ्या देशाला लांबलचक समुद्रकिनारा लाभला आहे. माझ्या देशात खूप नद्या आहेत. गंगा,यमुना, यांसारख्या मोठमोठ्या नद्यांमुळे माझा देश संपन्न झाला आहे .

माझ्या देशातील बहुसंख्य लोक शेतकरी आहेत . ते सर्व खेड्यामध्ये राहतात . दिल्ली, मुंबई यांसारखी अनेक महानगरे माझ्या देशात आहेत . या शहरामध्ये मोठमोठे उदयोग आहेत .

माझ्या देशात अनेक खेळाडू , कलावंत , शास्त्रज्ञ निर्माण झाले आहेत . त्यांनी भारताची कीर्ती जगभर पसरवली आहे. माझ्या देशात भिन्न भिन्न धर्माचे लोक राहतात; तरीही आम्ही सर्व भारतीय एक आहोत . तिरंगा हा आमचा राष्ट्रध्वज आहे .

माझा भारत देश हा थोर व पुण्यवान माणसांचा देश आहे. माझा देश मला खूप आवडतो . 

Answered by Mandar17
0

भारताचे इतिहास हे अति प्राचीन आहे. भारताला आधी जंबूद्वीप आणि आर्यावर्त हे नाव होते. दुष्यन्त आणि शकुंतला ह्यांचा पुत्र राजा भरत ह्यांचा नावावरूनच ह्या देशाचे भारत हे नाव पडले. भारत देशाला इंग्रजीत "इंडिया" असे हि म्हटले जाते. हे नाव सिंधू नदीवरून पडले. पूर्वी सिंधू नदीच्या खोऱ्यात वास्तव्य करणाऱ्या लोकांना  ग्रीक लोक इंडस म्हणत, त्या वरून इंग्रजांनी ह्या देशाला इंडिया हे नाव दिले. आपल्या संविधानात पण "India that is bharat" असे उल्लेख आहे.  

भारत १५ ऑगस्ट १९४७ ला स्वतंत्र झाला. आणि २६ जानेवारी १९५० ला घटना अमलात आली. भारताच्या संविधानाला भारतीय गणराज्य असे म्हटले जाते. भारतात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. भारतात प्रामुख्याने हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई असे ४ धर्म अस्तित्वात आहेत. आपल्या भारत देशात अनेक बोली आणि उपबोली बोलली जातात. भारतात एकूण २२ अधिकारीक भाष्य बोलल्या जातात. भारताची राजधानी दिल्ली आहे. भारताची राज्यभाषा हिंदी असली तरी आंतरराष्ट्रीय भाषा इंग्रजीच आहे. भारतात एकूण २९ राज्य आणि ७ केंद्र शासित राज्य आहेत. भारताची मुद्रा रुपया आहे. भारताचे एकूण क्षेत्रफळ 32.87.263 चौ किमी आहे. भारताची जनसंख्या १३३.९२ कोटी आहे.  

आपला भारत हा आर्थिक रित्या आणि सैन्य बळानेही खूप शाक्तशाली होण्याचा वाटचालीवर आहे. आपला भारत खूप महान आणि विविध परंपरेने नटलेला आहे.

Similar questions