speech on पाऊस पडला नाही तर..
Answers
Answered by
5
this mean is if not the rain
Answered by
24
पाऊस पडला नाही तर........ ही कल्पनाही अंगावर शहारे आणुन सोडते. पाऊस पडला नाही तर नदी, तलावे, विहिरी कोरडी होतील. सर्वदूर पाण्यासाठी भटकंती सुरू होईल. पशुपक्ष्यांना, जनावरांना व तसेच मानवाला पिण्यासाठी पाणी मिळणार नाही. शेतकरी शेती करू शकणार नाही, अन्नधान्य पिकवू शकणार नाही. पाऊस नसेल तर पाणी राहणार नाही, झाडांना पाणी मिळाले नाही तर ते कोमेजून जातिल, त्यांना फळे व फुले लागणार नाही. अंघोळ करण्यासाठी, कपडे-भांडी धुण्यासाठी पाणी मिळणार नाही. त्यामुळे अस्वच्छता निर्माण होईल व नवनवीन रोगराई पसरेल. सकाळपासून ते रात्रीपर्यंतचे सर्व कार्य पाण्यावर अवलंबून आहे. पाणीच नसेल तर जीवन नाही. कारण पाण्याची तुलना अमृता सोबत केलेली आहे.
Similar questions