Speech on rajmata jijau in marathi - राजमाता जिजाऊ वर भाषण लिहा
Answers
जिजाबाई यांना जिजाऊ, राजमाता, जिजामाता,मॉंसाहेब अश्या नावाने हि ओळखले जाते. राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईसाहेब होत्या. त्यांचा जन्म सिंदखेड येथे लखुजी जाधव ह्यांच्या घराण्यात इ. स. १५९८ झाला. त्यांचे विवाह शहाजी राजे भोसले यांच्यासोबत झाले.
जिजाऊ साहसी आणि बहादूर होत्या. शिवाजी महाराजांच्या चरित्र निर्माणात आणि त्यांना घडविण्यात जिजाऊचा सिंहाचा वाट होता. शिवाजी महाराजांना महाभारतातील आणि रामायणातील वीर पुरुषांची कथा सांगून सांगून त्यांच्यात वीरतेची, साहसाची, पराक्रमाची प्रवृत्ती जिजाऊनेच रुतवली. पुढे हीच धाडसी प्रवृत्ती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यास कामी आली. जिजामातांनी अतिशय कठोर परिस्थितीला समोर जाऊन हि आपल्या आठ अपत्यांचे योग्य संगोपन केले. आणि शहाजी महाराज्यांच्या अनुपस्थितही शिवाजी महाराजांना आदीलशाही आणि निजामशाही विरोधात उभे राहण्यास धीर दिला. अस्या थोर जिजाऊंचा मृत्यू २७ जून १६७४ जेष्ठ कृ. ९ , शके १५९६ मध्ये पाचाड येथे रायगडच्या पायथ्याशी झाला.