India Languages, asked by abhijeetjha2542, 1 year ago

Speech on raksha bandhan in marathi - रक्षा बंधनावर भाषण तयार करा

Answers

Answered by Ishwarsuvasiya
6

भारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये ‘रक्षाबंधन’ हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. देशभरात ह्या सणाची वेगवेगळ्या नावाने ओळख आहे. उत्तर भारतात ‘कजरी-पौर्णिमा’, पश्चिम भारतातात ‘नारळी पौर्णिमा’ या नावाने तो साजरा केला जातो.

इंद्र दानवांकडून पराजीत झाले होते. तेव्हा त्यांच्या उजव्या हातावर त्यांची पत्नी इंद्राणीने रक्षासूत्र बांधले होते. त्याने इंद्रदेवाचा आत्मविश्वास वाढला होता. त्यानंतर त्यांनी दानवावर विजय मिळवला होता. अशी पौराणिक कथा आहे. तसेच महाभारतात श्री कृष्‍णाच्या हाताच्या बोटाला जखम होऊन त्यातून रक्त वाहत होते. तेव्हा पांडवांची पत्नी द्रौपदीने आपल्या साडी किनार फाडून श्रीकृष्‍णाच्या बोटाला बांधून दिले होते. तेव्हापासून श्री कृष्णाने द्रोपदीचे रक्षण करण्‍याचा संकल्प केला होता व आजीवन त्यांनी दौपदीचे रक्षण केले.

भारतीय इतिहासात रक्षाबंधन संदर्भात अनेक उदाहरणे आहेत. चित्तौढगडची राणी कर्मावतीने बहादुरशाहपासून स्वत:ची रक्षा करण्यासाठी मुघल हुमायूला राखी बांधल्याचे उदाहरण आहे. हुमायूने राणीच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावली होती.

नोबल पुरस्कार विजेते रविंद्रनाथ टागोर यांनी बंगाल विभाजनानंतर हिंदु व मुस्लिम यांच्यात सलोखा निर्माण करण्‍यासाठी दोन्ही समुदायांना एकमेकांच्या हातावर रक्षासूत्र बांधण्याची विनंती केली होती.

पौराणिक कथा व इतिहात चाळता रक्षाबंधन या सणात काळानुरूप बदल झालेला आढळतो. आता तर हे पर्व भाऊ-बहिणीच्या अतुट नात्याचे, प्रेमाचे, स्नेहाचे व बंधनाचे पर्व म्हणून देशात साजरे होताना दिसते. त्यात बहिण आपल्या भावाच्या उजव्या हातावर राखी बांधत असते व भाऊ आपल्या लाडक्या बहिणीच्या रक्षणाचे दायित्त्व स्विकारत असतो.

काळ बदलला असला तरी आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात भाऊ- बहीनींच्या स्नेहाचा ‘रक्षाबंधण’ या सणाचे महत्त्व कायम आहे.

Answered by Mandar17
4

रक्षा बंधन हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे. हिंदू धर्माशिवाय अनेक धर्मातील लोक रक्षाबंधनाचा सण आनंदाने पार पाडतात. रक्षा बंधन हे बहिणीने आपल्या लाडक्या भावाला त्याच्या उजव्या मनगटावर राखी बांधण्याचा सण आहे. जे धागे बहीण राखीच्या स्वरूपात आपल्या भावाला बांधते ते त्याला आपले रक्षा कवच समजते. रक्षा बंधन म्हणजे बहिणीने भावाला त्याच्या कोणत्याही  विपरीत परिस्थितीत रक्षा करण्याचे भान राहील आणि आठवण राहील म्हणून बांधून दिलेले एकप्रकारचे शपथ पत्रच असते, जे भाऊ आनंदाने स्वीकारतो.  

रक्षाबंधनला  जागे नुसार वेगवेळ्या नावाने ओळखले जाते. काही ठिकाणी ह्याला सालूनो म्हणतात, तर काही ठिकाणी सिलोनो तर काही ठिकाणी राक्रि म्हणतात. रक्षा बंधन हे रक्ताचा नात्याला घट्ट करण्याचे आणि बहीण भावाचे पवित्र नाते जगासमोर मांडण्याचा सण आहे.  

Similar questions