India Languages, asked by gurshin2906, 1 year ago

Speech on republic day in marathi language - प्रजासत्ताक दिनावर भाषण द्या

Answers

Answered by Shanaya331990
1

प्रजासत्ताक दिवस : हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी फार महत्वाचा आहे. त्यापैकी एक म्हणजे ‘प्रजासत्ताक दिन’ हा होय. दर वर्षी जानेवारी महिन्याच्या २६ तारखेला भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जतो. आपला भारत १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा ‘प्रजासत्ताक दिन म्हणून मानला जातो. आमचा भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी चालविलेले राज्य आहे. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार २६ जानेवारी १९५० साली मिळाला. त्यादिवसापासून प्रजेची सत्ता सुरु झाली.हा दिवस भारतात सर्वत्र साजरा केला जातो. भारताच्या राजधानीत या दिवशी सकाळी ध्वजारोहणा नंतर लालकिल्ल्यावरून पंतप्रधान्नांचे राष्ट्राला उद्देशून भाषण होते. या समारंभाचा मुख्य कार्यक्रम भारताची राजधानी दिल्ली येथे होतो.या कार्यक्रमात भारताती सर्व घटकराज्ये भाग घेतात. भारताच्या सर्व क्षेत्रातील वैभवाचे दर्शनघडविणारी भली मोठी मिरवणूक काढतात. प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, शहरांत आणि गावागावातून ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा होतो. शाळांतून, सरकारी कार्यालयांतून व अन्यत्रही सकाळी ध्वजवंदन व अन्य मनोरंजनाचे कार्यक्रम होतात.ठिकठीकाणी प्रभातफेर्या भाषणे, प्रदर्शन यांचे आयोजन केले जाते. धाडशी मुलांचा,आणि विविध क्षेत्रात कर्तुत्व गाजविनार्यांचा या दिवशी सरकार तर्फे गौरव केला जातो. अनेक ठिकाणी रात्री रोशनाई केली जाते. प्राथमिक शाळांतून मुलांना खाऊ हि वाटला जातो. मुले हि आनंदित होतात.

hope it's help you

#shanaya


Shanaya331990: mark me as brainlist
Answered by Mandar17
1

२६ जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन. १५ आगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारताला आपले राज्य चालविण्यासाठी एका स्वतंत्र संविधानाची आवश्यकता होती. त्यासाठी संविधानाचे मसुदा तयार करण्याकरीता साविंधन सभेने मसुदा संमतीची थापना केली. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा कष्टाने भारतीय संविधान २ वर्ष, ११ महिने आणि १८ दिवसात तयार झाले आणि २६ जानेवारी १९५० रोजी ते अमलात आले. तेव्हापासून आपण २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करतो. प्रजासत्ताक दिवसाच्या पूर्व संध्येला राष्ट्रपती देशाच्या नावे भाषणाद्वारे आपले संदेश देतात. २६ जानेवारी ला प्रत्येक  शाळेत,ग्राम  पंचायत, तहसील कार्यालय, जिल्हा परिषद, विधानसभा, विधानपरिषद, राष्ट्रपती भवन इ. शासकीय, निमशाशकीय, प्रशासनिक आणि काही गैर प्रशासनिक संस्थेत धवजरोहण करण्यात येते. १९५० ला अमलात आलेला भारतीय गणराज्य आपल्या भारतात आजही चालत आहे.  

Similar questions
Math, 1 year ago