India Languages, asked by javkarparth, 1 month ago

story writting in marathi​

Attachments:

Answers

Answered by updhayayjaydevi
2

Explanation: please mark me brainliest

अनोखी मैत्री

विजय आणि अजय खूप चांगले मित्र होते. ते रोज एकत्र शाळेत जात, एकत्र अभ्यास करत, एकत्र खेळत. एकमेकांशिवाय त्यांचे पानही हलत नसे.

एकदा काय झाले, विजयची गृहपाठाची वही चुकून हरवली. विजय प्रचंड घाबरला कारण दुसऱ्या दिवशी वर्गशिक्षिका सर्व विद्यार्थ्यांच्या गृहपाठाच्या वह्या तपासणार होत्या. अजयलाही फार वाईट वाटले. दोघांनी आपापली दप्तरे पुन्हापुन्हा तपासली; पण वही मिळालीच नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी जड पावलांनी दोघे शाळेत पोहोचले. पहिल्याच तासाला वर्गशिक्षिकांनी गृहपाठ वह्या बाकावर काढून ठेवायला सांगितल्या.

वर्गशिक्षिका प्रत्येक बाकावरील वही तपासत होत्या. त्या विजयच्या बाकाजवळ जाण्याआधीच अजयने आपली वही विजयच्या बाकावर ठेवली. विजयची सुटका झाली. अजयला मात्र पन्नास उठाबशा आणि हातावर दोन छड्या मिळणार हे पाहून विजय रडवेला झाला. त्याने वर्गशिक्षिकांना सर्व सत्य सांगितले. अजयचे विजयवरचे प्रेम पाहून त्याही क्षणभरअवाक् झाल्या. अजयने विजयसाठी केलेला त्याग विजयच्या प्रामाणिकपणाइतका खरा होता. त्यांनी या दोन्ही लेकरांना पोटाशी धरले.

आज संध्यावळी घरी परतताना तो वळणावळणाचा रस्ता विजय-अजयच्या खुललेल्या चेहऱ्याकडे पाहून खुदकन हसला. घर जवळ येताच विजय अजयला ओढत ओढत घरी घेऊन गेला ते आईला आजची अनोखी गोष्ट सांगण्यासाठी! पाहतो तर काय, आई वही घेऊन चक्क दारात उभी! 'गडबडीत कपाटाच्या खाली सारून गेलास वही! विजय, किती हा वेंधळेपणा!" दोघा मित्रांनी एकमेकांकडे पाहिले. ते खुदकन हसले. मग मात्र आईला आपल्या जिवलग मित्राच्या अनोख्या मैत्रीची गोष्ट सांगण्यासाठी विजय पुढे सरसावला.

तात्पर्य : जो संकटात साथ देतो तोच खरा मित्र.

Similar questions