stree ha kutumb sansthecha kana..give 150 word essay in marathi..
Answers
can u ease in hindi please
Answer:ज्याप्रमाणे मधमाशी प्रत्येक पानाफुलातून थोडाथोडा मध गोळा करते तसेच प्रत्येक स्त्री आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी जे जे उत्तम, उत्तुंग आहे ते ते टिपण्याचा प्रयत्न करत असते. सौंदर्याचे छोटे चिमुकले क्षण-कण गोळा करत ती स्वत:बरोबर कुटुंबातील इतरांचेही जीवन समृद्ध करत असते. एक स्त्री ही तिच्या कुटुंबाचा कणा असते. त्या कुटुंबाचा विस्तार, संवर्धन हे तिच्याच हाती असते.
पूर्वी चूल आणि मूल इतकेच काय ते स्त्री चे कार्यक्षेत्र मर्यादित होते. कुटुंबात तिला दुय्यम स्थान होते पण तरीही तिने तिच्या कर्तव्यात मात्र कसूर केली नाही. एक स्त्री ही तिचे माहेर आणि सासर अशा दोन्ही घरांना जोडते. एकाच वेळी ती कित्येक नाती निभावत असते.
आपल्या मुलांवर योग्य संस्कार घडावेत यासाठी ती जिवाचे रान करते. मूल उदरात वाढवण्यापासून ते त्याला सुसंस्कृत व्यक्ती बनवण्यापर्यंतची जबाबदारी ती विनातक्रार पार पाडते. त्यामुळेच तर साने गुरुजी, शिवाजी महाराज यांसारख्या महान व्यक्ती घडल्या.
आज स्त्रियांच्या कार्यक्षेत्राच्या कक्षा रुंदावल्या आहेत. संसार सांभाळून ती विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवत आहे. हे करताना तिची प्रचंड दमछाक होत आहे तरीही नेटाने ती सगळ्या जबाबदा-या पेलत आहे.
भारतीय कुटुंबव्यवस्थेच्या यशाचं श्रेय हे या स्त्रियांंकडे जाते. म्हणून तिचे स्थान हे अतुलनीय आहे.
Explanation: