India Languages, asked by rupagautam, 1 year ago

summary of wings of fire in marathi​

Answers

Answered by theamazingmysterio
2

देशातील भारतरत्न हा सर्वोच्च नागर सन्मान मिळवणारे आजचे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम. या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूने आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारतानाच दुसर्‍या बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघर पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडण ही फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे. हे पुस्तक केवळ डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारत्याच्या तंत्रज्ञानाविषयक लढाईचे एक स्पंदन आहे. जागतिक शस्त्रस्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे. तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहर्षक खंडकाव्यच आहे.
Similar questions