India Languages, asked by poll7471, 9 months ago

svachhatavar samasya and upay nibandh marathi

Answers

Answered by pooja828
3

Answer:

जसजसे लोकसंख्येचे प्रमाण वाढत आहेत त्याप्रमाणात गाड्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रहदारी हे जीवन मरणाचे प्रश्न आ वासुन उभे आहेत. भारताच्या शहराशहरातून प्रदूषणाचे पट्टे निर्माण झाले आहे. माणूस दिवसेंदिवस रोगी होत आहे. अनेक रोगांनी त्याला विळखा घातला आहे. अनेक वाहनांच्या धुराड्यातून जीवघेणे वायू बाहेर पडत आहेत. तापमानात वाढ होत आहेत. श्वसनाचे रोग, त्वचेचे रोग, हृदय विकार, मेंदूचे रोग हे प्रदूषणाचे मूळ कारण आहे. अनेक तरुण ह्या आजारांना बळी पडून मृत्यू पावतात. त्यामुळे त्या व्यक्तीचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते. हलाखीचे जीवन जगावे लागते. खेडेगावातही प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहेत. ह्या समस्येवर उपाय असलेच पाहिजे अन्यथा मानवी जीवन धोक्यात येईल.

पहिली गोष्ट म्हणजे सर्व साधने C. N .G .असणे काळाची गरज आहे. दूसरे म्हणजे जिथे प्रदुषण होते तिथे वृक्ष लागवड करणे ( वृक्षारोपण ) करणे. रस्त्यांची लांबी, रुंदी, public Act नुसार वाढवावी. लोकप्रतिनिधींचे सहकार्य, मदत असणे काळाची गरज आहे. लोकहितासाठी विरोध करू नये. कारखाने वर्दळीच्या ठिकाणापासून दूर असावे. दूसरे म्हणजे जलप्रदूषण ह्यामुळे वर्षभर आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे पाणी शुद्ध करणारी यंत्रणा कार्यान्वित असावी. त्याकडे दुर्लक्ष होऊ नये. आपल्या आजूबाजूची स्वच्छता राखणे फार महत्त्वाचे आहे. तुंबलेली गटारे,पांथळ जागा स्वच्छ केली पाहिजे. पाण्यापासून होणारे रोग टाळण्यासाठी टाक्या

वेळच्यावेळी साफ होणे गरजेचे आहे. जंतूूनाशक पावडरचा वापर करण्यात यावा.

हवेतून होणारे वायुप्रदूषण म्हणजे फटाके व त्यातून होणारे प्रदूषण. केरकचरा नाले व त्यांची दुर्गंधी, मेलेली जनावरे, प्लास्टिकचे ज्वलन हे वायूप्रदूषण निर्माण करतात. अनेक आजारांना आमंत्रण देतात. म्हणून त्यांची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. स्वच्छतेचे महत्त्व लोकांना पटवून देणे. आरोग्य धोक्यात आणणाऱ्या प्रथा बंद करणे. कचरा व त्यापासून खत निर्मिती प्रकल्प राबविण्यात यावे.

Explanation:

████████▒★Mark me as a Brainlist

Similar questions