India Languages, asked by rintu9762, 11 months ago

Sweets Shop essay in Marathi

Answers

Answered by AadilAhluwalia
2

*मिठाईचे दुकान*

दर रविवारी मी आईसोबत बाजारात जातो. त्या दिवशी आम्ही मिठाईच्या दुकानात गेलेलो. आईला बासुंदी घ्यायची होती. त्या दुकानाचे नाव " स्वदिस्ट मिठाई " असे होते. दुकानात अनेक गॉड पदार्थ आणि मिठाई विकायला ठवली गेली होती. दुकानात गजबज होती. लोकांची ये जा होती. गर्दी पाहून माझा हे लक्षात आले की हे दुकान मिठाई साठी प्रसिद्ध आहे.

समोर काचेच्या कपाटात रंगीबेरंगी दिसणारे वेगवेगळे गॉड पदार्थ दिसत होते. पेढा, बर्फी, गुलाबजाम, रसगुल्ला, रासमालाई, गाजर हलवा, गोड पापडी, तिळगुळ, खरवस, दुधी हलवा, संदेस, खाजा आणि खूप काही. त्यांच्याकडे पाहून तोंडाला पाणी सुटत होतं. आतल्या खोलीतून मुठाईचा सुगंध येत होता आणि बाहेरचा बाजूला एक माणूस गरम गरम जिलेबी तळत होता. मला पटकन जिलेबी खाण्याची इच्छा झाली.दुकानात अनेक चॉकलेट सुद्धा होते.

आईने बासुंदी घेतली आणि माझे चमकलेलं डोळे पाहून माझ्यासाठी जिलेबी सुद्धा घेतली.

खरंच! मिठाईचे दुकान खूप छान असते.

Similar questions