Hindi, asked by rakhi009biyani, 7 months ago

तोडणी का बदं झाली ? subject marathi class 7​

Answers

Answered by ajha29884
0

Answer:

शेतकरी संघटनांनी केलेल्या मागणीप्रमाणे ऊस दर देता येणे शक्य नसल्याने उद्यापासून (ता. ३१) साखर कारखाने बंद करण्याचा निर्णय कारखानदारांनी घेतला आहे. आज मंगळवारी सायंकाळी खासगी व सहकारी २२ कारखान्यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारची मदत आवश्यक आहे, असे मतही कारखानदारांनी व्यक्त केले. या निर्णयामुळे राज्य सरकारला ऊस दराबाबत हस्तक्षेप करावा लागणार आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ९.५ बेस धरून जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपी अधिक दोनशे रुपये मिळून पहिली उचल ३१२७ रुपये देण्याची मागणी केली केली आहे. वारणा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शेतकरी, कष्टकरी परिषदेत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी १० टक्के बेस धरुन एफआरपी अधिक दोनशे रुपये धरून पहिली उचल २९५० रुपये देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. ऊसाला दर देण्यासाठी साखरेच्या दरात वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी पहिली उचल ३५०० रुपये देण्याची मागणी केली आहे. ऊस दराची घोषणा न करता कारखाने सुरु केल्यास ऊस तोड बंद करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. शेतकरी संघटना, शिवसेनेकडून ऊस तोडणी बंद केल्या जात आहेत.

जिल्ह्यात राजाराम सहकारी साखर कारखाना व संताजीराव घोरपडे साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे. काही कारखान्यांनी गळीत हंगामाची चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे. पुढील आठवड्यात सर्व साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची तयारी दर्शवली होती. ऊसाच्या दराबाबत जिल्ह्यातील १८ सहकारी व खासगी चार अशा २२ कारखान्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. बैठकीत ऊस दराबाबत चर्चा झाली. त्यामध्ये साखरेचे मूल्यांकन, बँकेकडून मिळणारी रक्कम, तोडणी वाहतुकीचा खर्च, कर्जाचे हप्ते, उत्पादन खर्च, वजा होणारे टॅगिंग, चालू हंगामामध्ये उपलब्ध होणारी रक्कम यामध्ये तफावत यावर चर्चा झाली. त्यानंतर सरकारच्या मदतीशिवाय शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करता येत नसल्याने साखर कारखाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. जे साखर कारखाने चालू आहेत त्यांनी सुरु असलेल्या ऊसाचे गाळप करून कारखाने बंद करण्याची तयारी दर्शवली. बैठकीला आमदार हसन मुश्रीफ, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, मंडलिक कारखान्याचे कार्यकारी संचालक एन. वाय. यादव, कुंभीचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील, जवाहर कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. जी. जोशी, राजाराम कारखान्याचे पी. जी. मेढे यांच्यासह साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते

Similar questions