ताजमहाल चा रंग पिवळा होण्याचे हे कारण आहे. *
Answers
Explanation:
जगतील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणजे आग्रा येथील 'ताजमहाल'. याच ताजमहालाचा रंग फिका पडत चालल्याने काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. त्यानंतर आाता केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यावरण मंत्री महेश शर्मा यांनी या प्रकरणात गांभिर्याने लक्ष घातलं आहे.
दुधासारख्या सफेद रंगाच्या ताजमहालावर आधी पिवळा रंग दिसत होता. नंतर तपकिरी आणि आता हिरवा रंग चढत असल्याने न्यायालयाने चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर आता केंद्रीय मंत्र्यांनी या प्रकरणी ताजमहालाच्या दगडांचा रंग नेमका कुठला याची माहिती घेण्यासाठी एक वैज्ञानिकांची एक टीम अभ्यास करेल आणि त्याचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करेल असं सांगितलं.
सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं
ताजमहालाचा रंग पिवळसर होता त्यानंतर तपकिरी झाला आणि आता हिरवा होत चालला आहे याबद्दल चिंता वाटत नाही का? असा प्रश्न विचारत न्यायालयाने केंद्र सरकारला १ मे रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान फटकारलं होतं.