World Languages, asked by diksha5192, 7 months ago

तुम्ही अनुभवलेल्या प्रवासाचे वर्णन तुमच्या शब्दात करा. in Marathi​

Answers

Answered by 57pranavdmandre
5

Answer:

स्थळ: कोडगू (कूर्ग) जिल्हा, कर्नाटक राज्य.

म्हैसूरहून मडिकेरीला जाणाऱ्या एसटी बसमध्ये बसलो होतो. त्याच मार्गावर दर काही मिनिटांवर बस असल्यामुळे तशी रिकामीच होती. मी, आई आणि बाबा गाडीत वेगवेगळ्या ठिकाणी खिडकीला चिकटून जागा पकडून ठेवलेल्या. ढगाळ वातावरण, गार हवा, त्यात किंचित ओलावा, बाहेरचा हिरवागार निसर्ग आणि एखाद्या विमानाप्रमाणे धावणारी बस यात सगळे अगदी रमून गेलेलो.

म्हैसूरच्याच बाहेर एके ठिकाणी बस थांबली. एक तिबेटी माणूस आणि एक माध्यमवयस्क बाई गडबडीत चढले. दोघेही तिथेच आसपास राहणारे वाटले. तिबेटी माणूस पुढे चालकाशेजारी जाऊन बसला पण त्या बाई तशाच मध्ये येऊन उभ्या राहिल्या. गोरा वर्ण, हलक्या पिवळ्या रंगाची साडी, लाल टिकली, दाट केसांची वेणी, आणि त्यात खोचलेलं एक छानसं सोनचाफ्याचे फूल. त्यांचा पेहराव पाहून जरा माझ्या आजीचाच भास झाला. का कोणास ठाऊक पण इतर कानडी बायकांपेक्षा ह्या जरा वेगळ्याच दिसत होत्या. उभ्या राहून सारखं खिडकीबाहेर डोकावून काहीतरी शोधत होत्या, नजर भिरभिर फिरत होती नुसती. माझंही लक्ष बाहेरच्या रस्त्याकडे सोडून त्यांच्या त्या अस्वस्थपणाकडेच टिकून राहिलं.

थोड्याच वेळात त्यांचा फोन वाजला आणि त्या बोलू लागल्या. चेहऱ्यावरच्या हावभावातून जीव भांड्यात पडल्याचं जाणवलं. काय बोलणं चालू होतं हे खूप ऐकायचा प्रयत्न केला पण काही धड ऐकू येईना. भाषा जरा वेगळी पण लय आणि पद्धत ओळखीची वाटत होती. शेवटी फोन ठेवताना म्हणाल्या,

"सरी, जाऊ दे! सरी, जाऊ दे!"

जाऊ दे?! बरोबर ऐकलं का मी?! कान तसे तिखट आहेत माझे आणि भाषांची आवड असल्यामुळे तर सार्वजनिक ठिकाणी तसेही कान टवकारलेले असतात. पण कन्नडमध्ये मराठी शब्द ऐकले मी! आता तर अजूनच उत्सुकता लागली. सुदैवाने अख्ख्या रिकाम्या बसमध्ये त्या माझ्याचशेजारी येऊन बसल्या!

संभाषणाला सुरुवात करायची होती पण काय बोलावे काही सुचेना. तेवढ्यात त्यांचा रुमाल खाली माझ्या पायापाशी पडला. मी आपला खडा टाकला लगेच,

"थांबा, देतो मी"

समोरच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले.

"तू मराटी हाय?"

हसत मी हो म्हणालो. त्यांचा पण आनंद चेहऱ्यावर लगेच दिसून आला. मग काय! नंतरचा एक तास कसा गेला काही कळलंच नाही. पहिल्यांदाच एका स्थानिक मराठी बाईला भेटलेलो कर्नाटकात. सुरुवातीला प्रत्येक वाक्य दोन वेळा म्हणायला सांगावं लागत होतं पण एकदा कानांना सवय झाल्यावर व्यवस्थित समजू लागलं. आश्चर्य म्हणजे त्यांना माझी पुणेरी भाषा बिनदिक्कत समजत होती. बोलताना अनेक कानडी शब्द येत होते पण संदर्भावरून काळात होतं सगळं. मराठीतले च़, ज़ आणि झ़ उच्चरता येत नव्हते आणि हेल काढून बोलल्यामुळे कानडी प्रभाव जाणवत होता प्रकर्षाने. पण जाम मजा येत होती!

नंतर कळालं की त्यांची आणि त्यांच्या जाउबाईंची चुकामुक होऊन वेगवेगळ्या बसमध्ये चढल्या होत्या दोघी. एका गावात दोन्ही बस स्टँडवर एकत्र आल्यावर भेट झाली दोघींची. उत्तर कर्नाटकातल्या जिल्ह्यात माझी ही भेट घडली असती तर काही नवल वाटलं नसतं. पण महाराष्ट्रापासून इतकं लांब, केरळच्या थोडंच वर आपले मराठी लोक भेटतील अशी कल्पना कोणी केली होती? गप्पा इतक्या रंगल्या होत्या की बस कंडक्टरने चक्क बाबांना तुमचा मुलगा नक्की काय करतो असं विचारलं!

काही शतकांपूर्वी हे लोक महाराष्ट्रातून येऊन इथे स्थायिक झाले आणि इथलेच होऊन गेले. पण आजही भाषा टिकून ठेवली ही केवढी मोठी बाब! ह्या बाईंचं कुटुंब हासन जिल्ह्यातलं होतं. नवरा चक्क म्हैसूरच्या राजवाड्यात कामाला होता आणि मुलं बंगळूरात राहायला. सगळ्या नातेवाईकांमध्ये फक्त एक कुटुंब पुण्यात राहत होतं. चव्हाण बाईंना तुमच्या मुलांना मराठी येते का विचारलं असता, अर्थातच! अशा आवेशात होकारार्थी मान डोलवली गेली. खूप समाधान वाटलं.

"तुम्ही तुमच्या बोलीला काय म्हणता?"

"शिवाजी मराठी!"

ऐकून इतकी गम्मत वाटली. पहिल्यांदाच हे नाव ऐकलं होतं! इतक्या शेकडो वर्षानंतरसुद्धा हे लोक आपला नातं शिवाजी महाराजांबरोबर जोडून ठेवतात याचा अभिमान वाटला! इथे महाराष्ट्रात आम्हाला आमचे बांधव कुठे कुठे आहेत याचा पत्तादेखील नाही, संस्कृती आणि भाषा जपण्याची तर गोष्ट दूरच! पण एका परराज्यात आजूबाजूला कन्नड आणि कोडवने वेढलेल्या प्रदेशात आपली भाषा शेकडो वर्षे टिकून ठेवणे किती अवघड काम!

पुढे कुशालनगरचा थांबा आला आणि 'येते हं' म्हणून त्या निघून गेल्या. पण आयुष्यभरासाठी एक सुंदर मनात आठवण ठेऊन गेल्या.

Explanation:

Similar questions