तुम्ही खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये काही वस्तू सदोष निघाल्या त्याविषयी तक्रार करणारे पत्र
Answers
पत्र लेखन.
Explanation:
लक्ष्मी संते,
हिरण्या बंगला
रजनीनगर,
नाशिक.
दिनांक: १७ नोव्हेंबर, २०२१
प्रति,
माननीय व्यवस्थापक,
राजधानी स्टोअर्स,
नाशिक.
विषय: खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये काही वस्तू सदोष निघाल्यामुळे तक्रार पत्र.
महोदय,
मी, लक्ष्मी संते, तुमची नियमित ग्राहक असून हे पत्र मला मिळालेल्या सदोष वस्तूंबद्दल तक्रार करण्यासाठी लिहत आहे.
गेल्या आठवड्यात मी तुमच्या दुकानातून एक डझन काचेच्या प्लेट, कप व चमचे विकत घेतले होते. त्याचे पार्सल मला काल मिळाले.
पार्सल खोलून मला फार आश्चर्य झाला कारण त्याच्यामधील बरेच कप व प्लेट फुटलेले होते. काही प्लेट्सचे रंग एका बाजूने फीके पडले होते.
तुमच्या दुकानातून मी बरेच वर्ष खरेदी करत आहे, परंतु मला असा अनुभव कधीच आला नव्हता. मी या सगळ्या वस्तू पार्सलने परत पाठवत आहे.
कृपया करून मला या वस्तू बदलून नवीन चांगल्या वस्तू त्वरित पाठवाव्या ही नम्र विनंती.
आपली विश्वासु,
लक्ष्मी संते.