तुम्हाला आवडणाऱ्या एका खेळाची माहिती लिहा (brief answer)
plz answer fast!!!!!
Answers
Answer:
Explanation:
क्रिकेट हा मैदानावर प्रत्येकी ११ खेळाडूंच्या दोन संघांदरम्यान, चेंडू(बाॅल) आणि फळी (बॅट) ने खेळला जाणारा मैदानी खेळ आहे. क्रिकेटच्या मैदानाच्या मध्यभागी एक २२-यार्ड लांबीची मुख्य खेळपट्टी असते. तिच्या दोन्ही टोकांना प्रत्येकी ३ लाकडी यष्टी असतात. एक संघ फलंदाजी संघ म्हणून खेळतो. हा संघ जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करतो, आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ क्षेत्ररक्षण करतो. खेळाच्या प्रत्येक टप्प्याला डाव असे म्हणतात. संघाचे दहा फलंदाज बाद झाल्यानंतर किंवा निर्धारित षटके पूर्ण झाल्यानंतर दोन्ही संघ आपापली भूमिका बदलतात. एका किंवा दोन डावांत अतिरिक्त धावा मिळून ज्या संघाची धावसंख्या जास्त असेल तो विजेता संघ म्हणून घोषित होतो.
प्रत्येक सामन्याच्या सुरुवातीला, दोन फलंदाज आणि अकरा क्षेत्ररक्षक खेळाच्या मैदानात उतरतात. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील गोलंदाज खेळपट्टीच्या एका टोकापासून, दुसऱ्या टोकाला असलेल्या फलंदाजाकडे (या फलंदाजाला स्ट्रायकर म्हणतात.) जेव्हा चेंडू फेकतो, तेव्हा खेळाला सुरुरवात होते. स्ट्रायकर खेळपट्टीवर यष्टीसमोर चार फुटांवर क्रीजमध्ये उभा राहतो. बॅटचा वापर करून चेंडू यष्ट्यांवर आदळण्यापूर्वी अडवणे आणि धावा करता येण्याइतपत टोलवणे ही फलंदाजाची भूमिका असते. दुसरा फलंदाज (नॉन-स्ट्रायकर), खेळपट्टीच्या दुसऱ्या टोकाला गोलंदाजाजवळ क्रीजच्या आतमध्ये उभा राहतो. बाद झालेल्या फलंदाजाला मैदान सोडावे लागते, आणि त्याच्या संघातील दुसरा खेळाडू त्याची जागा घेतो. फलंदाजाला धावा करू न देणे आणि त्याला बाद करणे ही गोलंदाजाची उद्दिष्ट्ये असतात. एकाच गोलंदाजाने एका मागोमाग एक सहा वेळा चेंडूफेक केल्यानंतर चेंडूफेकीचे एक षटक पूर्ण होते. त्यानंतरचे षटक दुसरा गोलंदाज, खेळपट्टीच्या दुसऱ्या बाजूने टाकतो.
Answer:
खो - खो खेेेेळाचा इतिहास
खो-खोची सुरुवात नेमकी कधी झाली हे कळणे कठीण आहे. खो खो या खेळाचा उगम महाराष्ट्राच्या या मातीतच खऱ्या अर्थाने झाला. पकडापकडीच्या खेळातून उत्क्रांती होत ह्या खेळाचा जन्म झाला असावा. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ह्या खेळात सुसूत्रता आणण्यास सुरुवात झाली. १९१४ साली पुणे जिमखाना येथे खो-खोचे नियम बनवण्यासाठी एका समितीची स्थापना झाली. १९२४ साली बडोदा जिमखान्याने खो-खोची नियमावली प्रसिद्ध केली. १९५९-६० साली भारत सरकारने आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे खो-खोची पहिली राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली. खो-खोच्या प्रतिभावंत खेळाडूंना भारत सरकारकडून पुढील पुरस्कार मिळतात.
अर्जुन पुरस्कार
एकलव्य पुरस्कार (पुरुषांसाठी)
राणी लक्ष्मीबाई पुरस्कार (महिंलांसाठी)
अभिमन्यू पुरस्कार (१८ वर्षे वयोगटाखालील मुलांसाठी)
जानकी पुरस्कार (१६ वर्षे वयोगटाखालील मुलींसाठी)
खेळााचे नियम
खो-खोमध्ये दोन संघ असतात. प्रत्येक संघात १२ खेळाडू असतात. परंतु एका वेळेस ९ खेळाडू खेळतात. खेळ दोन भागांमध्ये विभागला जातो. दोन भागांमध्ये ५ मिनिटे विश्रांतीचा कालावधी असतो. प्रत्येक भागात पुन्हा दोन उपभाग असतात. त्यातील पहिल्या उपभागात पहिला संघ पाठलाग करतो व दुसरा संघ बचाव करतो. दुसऱ्या उपभागात पहिला संघ बचाव करतो तर दुसरा पाठलाग करतो. दोन्ही उपभगांमध्ये २ मिनिटे विश्रांतीचा काळ असतो. थोडक्यात, संपूर्ण खेळ साधारणतः ३७ मिनिटे (७+२+७+५+७+२+७) चालतो.
खेळाच्या सुरुवातीला पाठलाग करणाऱ्या संघाचे आठ खेळाडू दोन खांबांमधील आठ चौकोनांत आळीपाळीने विरुद्ध दिशांना तोंड करून बसतात. नववा खेळाडू कोणत्याही एका खांबाजवळ उभा राहतो.बचाव करणाऱ्या संघाचे तीन खेळाडू मैदानात असतात. खेळ सुरू झाल्यावर पाठलाग करणाऱ्या सघाचा नववा खेळाडू बचाव करणाऱ्या संघाच्या तीन खेळाडूंना बाद करण्याचा प्रयत्न करतो. पाठलाग करणाऱ्या खेळाडूवर खालील बंधने असतात