History, asked by gunjalavinash242, 1 day ago

तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका विषयावर विस्तृत माहिती मिळवा व त्याचा इतिहास लिहा. उदा., * पेन (लेखणी)चा इतिहास​

Answers

Answered by dikshachavan258
15

Answer:

शाईचा पुरवठा सतत होणारी लेखणी तयार करावयाचे प्रयत्न फार पूर्वीपासून सुरू होते. १८०९ मध्ये बार्थोलोम्यू फॉश यांनी शाईचा साठा असणारी पण गुंतागुंतीची रचना असणारी एक लेखणी तयार केली. यापेक्षा अधिक गुंतागुंतीची रचना असलेली लेखणी १८१९ मध्ये जॉन शेफर यांनी तयार केली. त्याचवर्षी जे. एच्. ल्यूईस यांनी शाईचा साठा असणारी क्किल लेखणी तयार केली. या लेखणीलाच ‘पहिले फौंटन पेन’ असे म्हटले जाते. आधुनिक पेनाचे हे पूर्वरूप होय. साठ्यातून शाईचा सतत पुरवठा होत नसे हा या पेनाचा मोठा दोष होता. शाईचा साठा करू शकेल अशा साधनाच्या निर्मितीस लागणारे साहित्य त्या काळी उपलब्ध नसल्याने अशा पेनाची निर्मिती होऊ शकली नाही. १८३९ मध्ये व्हल्कनीकरणाचा [èरबर] शोध लागल्यावर उत्तम, टिकाऊ व शाईचा परिणाम होऊन खराब न होणारे असे व्हल्कनाइट वा एबोनाइट तयार होऊ लागले. या पदार्थाचा उपयोग शाईचा साठा करणाऱ्या धारकाच्या उत्पादनासाठी करण्यात येऊ लागला. १८८४ मध्ये न्यूयॉर्क येथील एल्. ई. वॉटरमन यांनी प्रथमच फौंटन पेन तयार करून बाजारात विक्रीस आणले. १८९० मध्ये फौंटन पेनाची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होऊ लागली

Similar questions