'तुम्ही सैनिक झालात तर ।' देशसेवा कशी कराल?
Answers
सैनिक टाकळीत शिरताना सामुदायिक भवनाच्या भोवताली एक ‘अमर जवान’ स्मारक पहावयास मिळतं. या स्मारकावर युद्धात कामी आलेल्या १८ जवानांची नावे कोरली आहेत.
महाराष्ट्रातील कोल्हापूरपासून ५० किमी दूर शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी ह्या गावाला अनेक पिढ्यांपासून सैनिकांचा इतिहास लाभला आहे. ५५०० लोकसंख्या असलेल्या या गावातील जवळपास प्रत्येक परिवाराने एक तरी सैनिक देशाला सुपूर्त केला आहे.
२००७ साली सैनिक समाज कल्याण मंडळाने या स्मारकाची स्थापना केली. मंडळाचे अध्यक्ष आणि सैनिक टाकळीचे रहिवासी लेफ्टनंट बाबासाहेब सीताराम पाटील ३६ वर्षे सैन्यात राहिल्यानंतर २००३ मध्ये सेवानिवृत्त झाले. ते म्हणतात, “ पूर्वी गावातील सुमारे १२०० परिवारातील किमान एक तरी तरुण देशसेवेसाठी सैन्यात जात असे; परंतु आजकाल सैन्यात भरती पदांची संख्या कमी झाल्याने स्पर्धेत वाढ झाली आहे. त्यामुळे सैन्यात जाणाऱ्यांची संख्या कमी झालेली आहे.”
पहिल्या महायुद्धाच्या वेळी इंग्रज सैन्याला सैनिकांची कमतरता जाणवू लागली तेव्हापासूनच सैनिक टाकळीतून तरुण सैन्यात रुजू होऊ लागले. १९६८ मध्ये सेनाप्रमुख जनरल परमशिव प्रभाकर कुमारमंगलम यांनी टाकळी गावाचे सैन्यदलातील योगदान पाहून त्याचे “सैनिक टाकळी” असे नामकरण केले.
पण पाटील यांच्या मते गावातील जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना योग्य सन्मान आणि मोबदला मिळालेला नाही. १९७८ मध्ये सैनिकांच्या कल्याणाकरिता कॅप्टन बापूसाहेब जाधवांनी स्थापन केलेल्या सैनिक समाज कल्याण मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. मंडळात जवळपास ६५० माजी सैनिक आणि २५० वर्तमान सैनिक आहेत. पाटील सांगतात, “येथे आम्ही त्यांचा मोबदला (जसे की पेन्शन) आणि शासन दरबारी असलेल्या अधिकारांची काळजी घेतो. बरेचसे सैनिक शिक्षित नसल्यामुळे त्यांचा कागदोपत्री व्यवहारदेखील आम्हीच सांभाळतो.” करायच्या गोष्टी -
१) छंद जोपासा,(असेल तरीही चालेल, नसेल तरीही चालेल).
२) आत्मविश्वास असेल तर उत्तम, नसेल तर तो तिथे(SSB ला) जायच्या आधी कसा येईल ते बघा(हे खूप गरजेचे आहे.)
३) इंग्रजी आणि हिंदी दोन्ही मध्ये संभाषण उत्तम रीतीने करता येणे गरजेचे आहे(कितीतरी जण म्हणतील हे गरजेचे नाही पण "screen in" च्या वेळेस तुमच्या लक्षात येईल याची गरज)
४) physical fitness आत्यंतिक गरजेचं म्हणून स्वतःच्या physical fitness कडे लक्ष द्या.
५) सगळ्यात महत्वाचा सल्ला - अधिकारी पदासाठीच्या निवडीसाठीची मुलाखत पद्धत ही जगातली सगळ्यात उत्तम पद्धत आहे आणि एकमेव पद्धत जिथे तुम्ही "जसे" आहेत तसे गेलात तरीही चालेल कारण त्यांना "तुम्ही" नेमके कसे आहेत ते बघायचे असते आणि त्या परीक्षा त्याच पद्धतीने तयार केल्या गेलेल्या आहेत म्हणून आजिबात खोटे बोलू नका आणि उगाचच "pretend" करायच्या भानगडीत पडू नका,फसाल.
त्यामुळे मुलाखतीसाठी जास्तच्या तयारीची गरज नाही.
तयारीच करायची असेल तर "group discussion" ,"public speech" इंग्रजीत बोलणे. "current affairs" ची माहिती ठेवणे, व्यायाम करणे हे सुरु ठेवा,आशावादी राहा.
बाकी मुलाखतीला बिनधास्त जा आणि अधिकारी कसे निवडले जातात त्याचा आनंद घ्या. हा अनुभव खूप शिकवून जाईल.
"recommend" झालात तर उत्तमच नाही झालात तर तुम्हाला आकाशात आपले नाव "आपल्या" परीने लिहिण्याची एक सुवर्णसंधी असेल हे लक्षात घ्या.
आणि हो SSB मुलाखतीमध्ये परीक्षक ते उमदेवार अधिकारी म्हणून कसे आहेत (आतून) हे बघितले जाते नुसता सैनिकासारखा दिसतो म्हणून त्याला select केलं जाईल या भ्रमात राहू नका.(केसांना सोल्जर कट मारलाय म्हणून त्याच्याकडे अधिकाऱ्याचे गुण असतील असे तर्क SSB तील परीक्षक लावत नाहीत)
(p.s.- आयुष्यात खूप कमी "civilian" लोकांना "cantonment" मध्ये जाण्याचा आणि लष्करी अधिकाऱ्यांसारखी "treatment" मिळण्याचा अनुभव घेता येतो म्हणून SSB मुलाखतीला जाण्याची संधी जर मिळत असेल तर ती धुडकावू नये काय माहीत आत जाताना तुम्ही "civilian" असाल आणि बाहेर येताना "a civilian who is a perfect army material" असे असाल.)