India Languages, asked by pereiraalister04, 10 months ago

तुम्ही तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणी भेटीला आसुसले आहात हे सांगण्यासाठी एखादा दृष्टान्त वापरा व तो स्पष्ट करा​

Answers

Answered by MAULIKSARASWAT
4

आपला समाज प्रणय संबंधांवर जोर देण्याकडे झुकत आहे. आम्हाला वाटते की योग्य व्यक्ती शोधल्यास आपल्याला आनंद होतो आणि ते पूर्ण होईल. परंतु संशोधनात असे दिसून आले आहे की मित्र आमच्या मानसिक कल्याणासाठी अधिक महत्त्वाचे आहेत. अक्षरशः कोणत्याही गोष्टीपेक्षा मित्र आपल्या जीवनात अधिक आनंद आणतात.

मैत्रीचा तुमच्या मानसिक आरोग्यावर आणि आनंदावर खूप परिणाम होतो. चांगले मित्र ताणतणाव दूर करतात, सांत्वन आणि आनंद प्रदान करतात आणि एकटेपणा आणि अलगाव टाळतात. जवळच्या मैत्रीचा विकास केल्याने तुमच्या शारीरिक आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो. सामाजिक कनेक्शनचा अभाव धूम्रपान करणे, जास्त मद्यपान करणे किंवा गतिहीन जीवनशैली जगणे यास जोखीम असू शकते. मित्र अगदी दीर्घायुष्यात बांधलेले असतात. एका स्वीडिश अभ्यासानुसार, शारिरीक कृतीबरोबरच मित्रांचे जाळे टिकवून ठेवण्यामुळे तुमच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण वर्षं वाढू शकतात.

परंतु जवळची मैत्री फक्त असे होत नाही. आपल्यापैकी बर्‍याच जणांना लोकांना भेटायला आणि दर्जेदार कनेक्शन विकसित करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. आपले वय किंवा परिस्थिती काहीही असली तरीही, नवीन मित्र बनविण्यात, जुन्याशी पुन्हा संपर्क साधण्यास आणि आपले सामाजिक जीवन, भावनिक आरोग्य आणि एकूणच कल्याण सुधारण्यास कधीही उशीर होणार नाही.

Answered by yashbhai9969
0

Answer:

उद्देश जर चांगला असेल तर अनोळखी व्यक्ती सोबत सुद्धा खूप छान मैत्री होऊ शकते.

टिंडर, टृली-मॅडली यांसारख्या अप्लिकेशन चा दुरुपयोगच जास्त दिसतो. फसवेगिरी तर प्रचंड.

तरुण वयामध्ये या सर्व प्रलोभनांचा अनुभव घ्यावा पण याच्या आहारी जाणे म्हणजे निव्वळ वेळेचा अपव्यय. तुम्ही जे शोधत असता ते अशा ठिकाणी मिळेलच असे जरुरी नाही.

असच मी देखील खाजगी आयुष्यात प्रचंड आपटी खाल्ल्यानंतर भेलकांडात अशा एका ठिकाणी पोहोचलो. एकेकाळी फेसबुक सुद्धा मला अनावश्यक वाटायचं. पण जसे जसे पुढे गेलो तसे तसे सगळीकडेच हात पाय पसरत गेले.

आम्हालाही कुतूहल प्रचंड. पण प्रत्त्येक वेळी फक्त भ्रमनिरास व्हायचा. कारण इथे बोलायचा उद्देश आणि मुद्दा फक्त एकच असतो. सांगायची गरजच नाही काय असतो ते. चोराच्या मनात चांदणे.

भ्रमनिरास अशामुळे कि आपले छंद सगळ्यांच्या गळ्यात उतरतच नव्हेते कधी. वाचन, संगीत आणि विज्ञान अशा विषयांना अशा ठिकाणी जागाच नाही. आणि लोणी लावायला आपल्याला जमत नाही. मग संभाषण कशावर करायचं?

पण एके दिवशी एका व्यक्तीशी ओळख झाली. माझ्यापेक्षा वयाने ३ वर्षांनी मोठी असलेल्या. या व्यक्तीने पण नुकतीच खाजगी आयुष्यात आम्ही जशी आपटी खाल्ली होती तसाच अनुभव यांना आल्यामुळे या देखील भेलकांडात नको त्या ठिकाणी येऊन धडकलेल्या.

आवड निवड जुळली. व्यक्तीने पुढाकार घेऊन विश्वास ठेवून आपली खरी ओळख दिली. मग आम्ही पण आपला बायोडाटा खुला केला.

एकमेकांची खरी ओळख पटल्यानंतर प्रथम संवाद फेसबुक वर झाला. भरोसा बसल्यानंतर भ्रमणध्वनीच्या क्रमांकाची देवाणघेवाण झाली. हा सर्व पुढाकार या व्यक्तीनेच घेतलेला. लिखित संभाषण फेसबुक वर बरेच झालेलं पण प्रथम ज्यावेळी आवाज ऐकला त्यावेळी दोघांनाही हॅलो या शब्दापुढे काय बोलावं ते सुचेना. हि अवघडलेली अवस्था देखील लवकरच निकालात निघाली.

जसे जसे दिवस जायला लागले तसे तसे नवीन अनुभव यायला लागले. ओळख झालेली व्यक्ती अत्यंत हुशार, तीन पदव्या असलेली आणि स्वावलंबी निघाली. अभिमानाने सांगू इच्छितो कि वयाच्या २६ व्या वर्षी यांची स्वतःची स्वतःच्या कमाईने कमावलेली एक छोटेखानी चार चाकी होती. सांगताना खूप आनंद होतोय कि यांचे छोटे बंधू प्रचंड बुद्धिवान असून मागील वर्षी यांची निवड NASA च्या एका उपक्रमासाठी झालेली.

माझ्या या खास मैत्रिणीने मला दोन अत्यंत अविस्मरणीय अशा भेटवस्तू दिल्या.

वाचनाची आवड दोघांनाही असल्यामुळे काय काय वाचले आहे याबाबत चर्चा तर व्हायचीच परंतु आजच्या घडीला माझा आवडत्या असलेल्या डेविड बाल्डासी या लेखकाची ओळख या व्यक्तीने मला दिलेली.

भेटायचं तर होत पण व्यक्ती परराज्यातील आणि खूप लांब माझ्या राहत्या ठिकाणापासून.

आणि मग न भूतो न भविष्यती अशी सर्वात खास भेट या व्यक्तीने मला दिली ती म्हणजे म्हणजे माझ्या आयुष्यातील माझा पहिला विमान प्रवास, लॉज मध्ये खोली भाड्याने घेऊन राहणे आणि खाजगी चारचाकीचा अनुभव.

स्वतः च्या राहत्या ठिकाणी भेटायला बोलावून मुंबई ते दिल्ली आणि परत अशा विमानप्रवासाचा पूर्ण खर्च माझ्या मैत्रिणीने केलेला. अगदी विमानतळापासून ते जिथे माझ्या राहण्याची व्यवस्था केलेली तिथपर्यंत खाजगी चारचाकी म्हणजे Ola Uber सारख्या सुविधेचा खर्च पूर्णपणे उचललेला. माझ्या आयुष्यात मला विमानप्रवासाची कधी गरज पडली नव्हती. आणि इतक्या लांबपर्यंत आपली कधी मजल ही नव्हती. तसेच खाजगी गाडी बुक करून वापरायची सुद्धा कधीच गरज पडली नव्हती. आणि हॉटेल मध्ये खोली भाड्याने घेऊन राहण्याचा प्रसंग देखील कधीच आला नव्हता. पण माझ्या आयुष्यात या व्यक्तीमार्फत या सर्व गोष्टी मला भेटस्वरूपात मिळाल्या. अशी अत्यंत आगळीवेगळी भेट मला आयुष्यात कधी मिळेल असे स्वप्न देखील मी पाहिलं नव्हतं कधी. अशी मैत्री आणि असे मित्र आयुष्यात एकदाच भेटतात.

प्रथम भेटीचा अनुभव सांगायचं झालं तर अवघडलेपण इतकं प्रचंड होतं कि यांच्या चारचाकीत बसल्यावर या एका काचेतून आणि मी दुसऱ्या काचेतून एकमेकांकडे न बघता फक्त मोठ्याने हसत होतो. कारण चॅटिंग आणि भ्रमणध्वनीवर संभाषण आणि प्रत्यक्ष समोरासमोर बोलणे या प्रकारात अत्यंत वेगळा अनुभव असतो. परंतु जसा जसा वेळ गेला तसं तसं वातावरण मोकळं होत गेलं. मग मात्र आमच्या गप्पा प्रचंड रंगल्या.

नंतर आमचा छान असा एक गट तयार झालेला. खूप साऱ्या आठवणी आहेत. हे नातं इतकं निखळ आणि सुंदर होत की मला आजही आठवण आली की सर्व काही एका चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोरून फिरत राहतं. डोळ्यात पाणी तरळतय हे लिहिताना देखील.

मी उघडपणे इथे सर्वाना सांगू इच्छितो कि आमच्या या मैत्रीच्या नात्यामध्ये डागाळलेली एकही गोष्ट नाही. कारण माझ्या आयुष्यातील या सर्व घटना उघडपणे झालेल्या. कोणी मला उपद्व्यापी म्हणेल किंवा अजून काही म्हणेल. पण माझ्या जवळच्या लोकांना सर्व गोष्टी माहित असल्यामुळे मला चिंता नाही.

काळाच्या ओघात सर्व गोष्टी मागे पडत जातात. राहतात आणि उरतात त्या फक्त आठवणी. इतर बऱ्याच लोकांशी मैत्री झाली. सुदैवाने मला चांगले अनुभव आले. आणि कुठलाही अनुभव हा वाह्यात प्रकारचा नव्हता हे मी आवर्जून सांगू इच्छितो. या सर्व प्रकारांमुळे मला बरीच भ्रमंती किंवा पर्यटन करायची संधी मिळाली.

अजूनही रोचक अशा घटना जरूर घडल्यात पण पुन्हा कधीतरी.

842 वेळा पाहिले गेले

अपव्होट्स पहा

जितू सुर्वे

 कडून उत्तराची विनंती केली.

35

1

संबंधित प्रश्न (अधिक उत्तरे खाली वाचा)

ऑनलाईन फी न भरता दररोज 500 पैसे कमावता येतात का?

31,424 व्ह्यूज

Similar questions